HomeUncategorizedसुंबेवाडी गावात विकासाचा प्रकाश..!

सुंबेवाडी गावात विकासाचा प्रकाश..!

आष्टी / पठाण शाहनवाज

आष्टी तालुक्यातील सुंबेवाडी येथे पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत एल ई डी पथदिवे बसवण्यात आले.विकास आणि सुंबेवाडी गाव हे समीकरण मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. देशसेवेसह गावच्या विकासाचे स्वप्न उरी बाळगणारे मेजर अमर वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच योगेश शेळके यांनी गावच्या विकासाची मशाल हाती घेतली आहे. कुठलेही परिवर्तन सहजासहजी घडत नसून त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. आपला अमुल्य वेळ खर्ची घालावा लागतो. मनामध्ये निस्वार्थ भाव ठेवून स्वतःला झोकून द्यावे लागते. जनमाणसात आपली निखळ प्रतिमा उमटवण्यासाठी उदात्त हेतू मनी असावा असा मेजर अमर वाळके यांचा नेहमीच खटाटोप राहिलेला आहे. त्याकरिता ते सदैव तत्पर असतात. गावच्या विकासाच्या कामात सर्वांनी सोबत चालत राहिले तर नक्कीच सर्वांचा विकास घडून गावाचे नाव उज्ज्वल झाल्याबिगर राहत नाही. “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे आपण चालत राहू. 
       आज सुंबेवाडी येथील शेळके वस्ती(म्हसोबावस्ती)वरील हनूमान मंदिर ते दिपक शेळके यांच्या घरापर्यंत रोडवर साधारण ८०० मी अंतरावर २० एलईडी पथदिवे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत बसवण्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशाप्रकारे गावचा विकास होत गेला तर एक दिवस सुंबेवाडी आदर्शगाव झाल्याशिवाय राहणार नाही असे जनमानसातून बोल उठू लागले आहेत. प्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच विविध सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक आणि अनेक नवयुवक उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments