HomeUncategorizedगर्जा प्रतिष्ठानच्या कलाकारांना राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर

गर्जा प्रतिष्ठानच्या कलाकारांना राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर

मुरबाड / ठाणे ( प्रतिनिधी आशा रणखांबे )  
पुणे येथील आर्टस् बिट्स फौंडेशन या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने दरवर्षी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांच्या कार्याचा गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन केला जातो. यंदा आर्ट्स बिट्स फॉउंडेशनच्या पुरस्कारावर मुरबाड तालुक्यातील गर्जा प्रतिष्टानच्या तीन सदस्यांनी आपले नाव कोरले आहे. मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध कलाकार संतोष भांडे यांस अभिनयासाठी राज्य स्तरीय कला गौरव पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे तर तालुक्यातील युवा कलाकार प्रथमेश रोठे आणि राजेश काकडे यांना अभिनयासाठी युवा कला गौरव पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. 
     संतोष भांडे या उमद्या कलाकाराने आजवर सातत्याने शेकडो पथनाट्ये,नाटके, लघुचित्रपट, म्युजिक अल्बम, वेबसिरीज व चित्रपटांतील आपल्या विविधांगी भूमिकांतून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. तर प्रथमेश रोठे व राजेंद्र काकडे या नवोदित पण हरहुन्नरी कलावंतांनी आपल्या अभिनय कौश्यल्याने प्रेक्षक वर्गावर अक्षरश गारुड उभारले आहे . अभिनय क्षेत्रातील त्यांचा उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे . या बद्दल विविध स्थरावरून या कलाकारांचे अभिनंदन होत आहे. 
या पुरस्काराची माहिती देताना आर्टस् बिट्स पुणे या संस्थेचे संस्थापक संचालक संतोष पांचाळ म्हणाले कि, ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. 
      गर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या तीन कलाकारांची निवड या पुरस्कारासाठी झाली. या सन्मानामुळे कलाक्षेत्रात कार्य करण्यास आम्हाला नवी उमेद व प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त करून गर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितेश मंगल डोंगरे यांनी यावेळी बोलतांना आपले मत व्यक्त करून आर्टस् बिट्स फौंडेशन या संस्थेचे मनापासून आभार मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments