HomeUncategorizedपरळीतील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशिल - सौ. राजश्री मुंडे

परळीतील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशिल – सौ. राजश्री मुंडे


परळी : शहरातील असंख्य महिला बचत गट व गृहउद्योगातुन कुटुंबनिर्वाह करत आहेत.महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिला बचत गटास सहकार्य व उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी सांगीतले.
शिक्षण सभापती यांच्या प्रभाग पाच मधील संपर्क कार्यालयात सौ.राजश्री मुंडे यांनी सोमवारी (दि.11) भेट दिली यावेळी सौ.शुभांगी गोपाळ आंधळे, मुलगी कु.रिया आंधळे यांनी सौ.राजश्री मुंडे यांचा कौटुंबिक  हद्य सत्कार करत त्यांना प्रभाग क्र.5 मधील पाच वर्षाच्या कार्याचा अहवाल दिला.या प्रसंगी राजश्री मुंडे म्हणाल्या की,महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्मिती करण्याची संधी प्राप्त होत असून स्वयंरोजगार निर्मितीमुळे बचत गटाचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील असुन अनेक योजनेच्या माध्यमातून महिला कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.परळीतील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सौ.मुंडे यांनी सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष शकीलभाई कुरेशी, नगरसेवक अजीज भाई कच्छी, माजी नगरसेवक रवी मुळे, रामदास कराड, मोहन साखरे,   हनुमान आगरकर, पिन्टू तळेकर यांच्या सह  प्रभाग पाच मधील अनेक महिला उपस्थित होत्या.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments