संग्रामपुर [ मकसूद अली ]
संत महात्माच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या संग्रामपुर तालुक्यात पातुर्डानगरी सर्वात मोठे गाव असुन २३ खेडे गाव लागु असुन शेतकरी शेत मजुर असल्याने पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंन्द्रात आरोग्य विभागा करवी दोन वैधकिय अधिकारी (एम बी बी एस ) डॉ विलास चौधरी व डॉ बोडखे यांची ५ नोव्हेंबर रोजी वैधकिय अधिकारी यांना या प्राथमिक आरोग्य केंन्द्रात रुजु होण्याचे आदेश देण्यात आले मात्र दोन्ही सुरुवात पासुनच वरिष्ट अधिकाऱ्याच्या आदेशाची पायमल्ली करत वैधकिय अधिकारी ३० सप्टेंबरला रुजु झाले मनमानीचा कळस गाठत महिण्यात दोन्ही वैधकिय अधिकारी यांनी ३ दिवस दिन जावो पैसा आवो प्रमाणे थातुर मातुर रुग्णांना सेवा दिली प्राथमिक आरोग्य केंन्द्र सकाळी ८:३० उघडण्याची वेळ प्रमाणे आरोग्य केंन्द्रातील औषध निर्माता सह सर्व कर्मचारी हजर होते मात्र वैधकिय अधिकारी डॉ विलास चौधरी यांची डिवटी असतांना दिवसभर प्राथमिक आरोग्य केंन्द्रात फिरकले नाहीत पातुर्डा परिसरातील गरिब रुग्ण प्राथमिक आरोग्य केंन्द्रात औषध उपचारासाठी येतात मात्र वैधकिय अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने त्रस्त असल्याची ओरड होत आहे देऊळगाव पातुर्डा आस्वंद आदिगावातील रुग्ण या आरोग्य केंन्द्रात आले असता वैधकिय तपासणी न करता रोष व्यक्त करत परत जात असतांना औषध निर्माता एस व्ही शेगोकार यांनी किळकोळ उपचार केले १ आठवड्या पुर्वी या आरोग्य केंन्द्रात खेडेगावातील प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांची वैधकिय अधिकारी अभावी तिन चाकी वाहनातच प्रसुती झाली होती संबंधीत रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाचा सामना दोष नसणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागला दोन्ही वैधकिय अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आरोग्य विभाग नावालाच असल्याची प्रतिक्रिया रुग्णांतुन उमटत असुन रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन चौकशी करुन संबंधीत वैधकिय अधिकारी यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी अशी मांगणी त्रस्त रुग्ण व नागरिकां कडून जोर धरत आहे
बॉक्स
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे यांना दुरध्वनी व्दारे देऊळगाव येथील माजी सैनिक दादाराव परघरमोर हे बराच वेळ झाल्यानंतर वैधकिय अधिकारी आले नसल्याची बाबतची तक्रार केली कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी भारसाकळे यांनी वरिष्ट अधिकाऱ्याशी संपर्क साधुन कामचुकार दांडी बहाद्दर वैधकिय अधिकारी यांची चौकशी करुन कारवाईची व आरोग्य सेविका मुख्यालई राहण्याची मांगणी केली तसेच चुर्तुथ श्रेणी २ रिक्त पदे , आरोग्य साहिका १ पद, कनिष्ठ सहाय्यक १ रिक्त पद आरोग्य सहाय्यक १ रिक्त पद , आरोग्य सेविका ३ रिक्त पदे भरण्याची मांगणी केली