HomeUncategorizedशिवसेना संपवू पाहणाऱ्या गद्दारांना सामान्य शिवसैनिक पायदळी तुडवल्या शिवाय राहणार नाही ;...

शिवसेना संपवू पाहणाऱ्या गद्दारांना सामान्य शिवसैनिक पायदळी तुडवल्या शिवाय राहणार नाही ; खा.हेमंत पाटील

वसमत / डॉ नागोराव जांबूतकर 

 वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी उत्स्फूर्तपणे जमलेल्या शिवप्रेमी सह हिंगोली लोकसभेचे खासदार श्री हेमंत पाटील यांच्यावर प्रशासनाने कुणाच्या तरी सांगण्याहून गुन्हे नोंद केले याच्या निषेधार्थ आज खा.हेमंत पाटील आणि हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी शिवप्रेमी सह खासदार साहेबांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनास देण्यात आले तसेच विश्रामगृह हिंगोली येथील बैठकीत बोलताना खा .पाटील म्हणाले की छत्रपती शिवरायांसाठी अश्या हजारो केसेस झाल्यातरी मी डगमगणारा नाही यावेळी बोलताना आ.बांगर म्हणाले की आमदार राजू नवघरे यांचे शिवसेनेवर टीका करणे चुकीचे आहे. खरंतर त्यांच्यानेच एवढी मोठी चूक होऊनसुद्धा शिवसेनेने कुठलेही राजकीय भांडवल केले नाही तरी सुद्धा स्वतः च्या चूकीवर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार नवघरे हे करीत आहेत.तसेच सेनेतील काही गद्दार त्यांना साथ देत आहेत अश्या गद्दारांना सशिवसैनिक पायदळी तुडवल्या शिवाय राहणार नाहीत. यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ.रमेश शिंदे,जि. प.अध्यक्ष गनाजीराव बेले,माजी जि. प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड,जि. प. समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे,परमेश्वर मांडगे,संदेश देशमुख, जि. प. सदस्य बाळासाहेब मगर, विठ्ठलराव चौतमल, अंकुश आहेर,नंदकिशोर खिल्लारे, तालुकाप्रमुख भानुदास राव जाधव,राजुभाऊ

 चापके,आनंदराव जगताप, नगरसेवक सुभाषराव बांगर,प्रल्हादराव राखोंडे, श्रीनिवास पोरजवार,रवी नादरे पाटील,ईश्वर तांबोळी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments