वसमत / डॉ नागोराव जांबूतकर
तालूक्यातील पांग्रा शिंदे सर्कल मधील जिल्हा परिषद अंतर्गत सण 2019-20, मध्ये मंजूर कामामध्ये शिक्षण विभागातील शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्या बांधकाम अंतर्गत पांगरा शिंदे येथे 10.लक्ष रुपये दुरुस्तीसाठी आणि सिरळी येथे 10. लक्ष रुपये दुरुस्तीसाठी व 3 नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या होत्या.
सदरील कामाची प्रशासकीय मान्यता होऊन त्यांची नीवीदा प्रकिया होऊन फक्त कार्यारंभ आदेश देने बाकी असताना सदरील कामांना जाणीवपूर्वक रद्द करून, त्या कामाच्या ठिकाणी नवीन काम करण्याचे कट-कारस्थान करण्यात येत आसल्याचा आरोप पांग्राशिंदे सर्कलच्या जी प सदशा सूवर्णमाला शिंदे यांनी केला आहे
सदरील कामे माजी.शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्या काळात मंजूर करण्यात आले होते , त्याना पाय ऊतार झाल्या नंतर त्याठिकाणी नवीन सभापतीची निवड करण्यात आली आहे. सदरील कामे त्या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक असताना ती कामे बदलणे, ह्या दोन्ही गोष्टी गावासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी धक्कादायक बाब आसल्याचेही त्याचे म्हनने आहे
वरील कामाची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुवर्णमाला अवधूत शिंदे ह्या सतत 3 महिन्या पासून प्रयत्न करीत आहेत.
त्यासाठी स्थाईसमिती व जनरल बॉडी च्या मिटिंग मध्ये सुद्धा आवाज उठविण्यात आला. सदरील काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबंधित विभागाकडे देण्यात आली आहे.
कोणतेही कामे रद्द करण्यासाठी ठोस कारण असने आवश्यक असते, जसे-त्या ठिकाणी जागेची अडचण असणे किंवा संबंधित काम दुसऱ्या योजनेतून मंजूर झालेले असणे किंवा, त्याठिकाणी शाळा समितीचा मागणीचा अहवाल नसणे किंवा, B.O चा अहवाल असणे ह्या सर्व गोष्टी संबंधित कामासाठी पूर्ण करून सुद्धा फक्त सत्तेच्या जोरावर कामे रद्द करण्यात येत आसल्याचाही आरोप त्यानी केला आहे व या सर्कल मधील होत आसलेल्या वीकास कामाची आडवनूक आननार्याचा मी जाहीर निषेध करते आसा आरोपही त्यानी व्याक्त केला आहे
वरील कामांसाठी मा.आमदार साहेब यांना फोनवरून माहिती देऊन ही कामे आपल्या मतदार संघातील आहे आणि, त्याठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या नाहीत असे निदर्शनास आणून देण्यात आले होते आणि, नवीन सभापती हा आमदार साहेबांच्या गावातील असून त्यांच्या मर्जीमुळेच सभापती झालेला आहे. तरीसुद्धा वरील कामे रद्द होतात हे 100% राजकारण आहे.
ही कामे फक्त आम्ही शिफारस केली म्हणून रद्द करण्यात येत आहेत, जाणीवपूर्वक ही कामे रद्द करणे म्हणजे मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाला तडा जाणार यात तिळमात्र ही शंका नाही.
लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात येत असतात, आणि ते करण्यासाठी आपण एक माध्यम असतो , हे कदापिही विसरू नये. सत्ता आज आहे आणि उद्या नाही , आपण आज आहे तर उद्या कुणी दूसरा राहील.
ही जर कामे माझ्या शिफारशी मुळे झाले तर जनतेचा त्यांच्यावरील विश्वास वाढत जाईल, म्हणून ती कामे होऊच नयेत असा प्रयत्न होत आहे.
आसा आरोपही त्यानी केला आहे