HomeUncategorizedखा.हेमंत पाटील व आ.संतोष बांगर यांनी कळमनुरी येथे रात्रभर पडलेल्या पावसामुळे...

खा.हेमंत पाटील व आ.संतोष बांगर यांनी कळमनुरी येथे रात्रभर पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली तातडीने पाहणी.!

वसमत / डॉ नागोराव जांबूतकर

हींगोली जील्ह्यातील सोडेगाव ता कळमनूरी येथील कयाधु नदीच्या पुलाजवळ मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची खासदार हेमंतभाऊ पाटील व आमदार संतोष बांगर साहेब यांनी केली पाहणी
हिंगोली लोकसभेचे खासदार श्री हेमंत भाऊ पाटील आणि हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी कळमनुरी येथे काल रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी च्या जुन्या इमारतीत पाणी घुसल्या मुळे नुकसान झाले तसेच बुडकी नाला परिसरातील आजूबाजूच्या दुकानात देखील पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने भल्या पहाटेच पाहणी केली . तसेच सोडेगाव येथील कयाधु नदीच्या पुलाजवळ मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली आणि शासन स्तरावरून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
          यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ.रमेश शिंदे,जि. प.अध्यक्ष गनाजीराव बेले,माजी जि. प.उपाध्यक्ष उद्धवजी गायकवाड,जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि. प.सदस्य विठ्ठल राव चौतमल, नंदकिशोर खिल्लारे, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे,तालुकाप्रमुख भानुदासराव जाधव,पंचायत समिती सदस्य संजय मंदाडे,जसवंत काळे, शहरप्रमुख संतोष सारडा, गटनेते अप्पाराव शिंदे,नगरसेवक अतुल बुर्से,संभाजी सोनुने,नामदेव कर्हाळे, चंद्रकांत देशमुख,,डॉ.मेने ,मयूर शिंदे,शिवराज पाटील,रोहित काळूशे, पिंटू गडदे, बहेरु गुंजकर, अक्षय ढगे,शिवा गायकवाड,गजानन काळे व मोठ्या संख्येने इतर नागरिक उपस्थित होते…
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments