आष्टी / पठाण शाहनवाज
तालुक्यातील वाळुंज येथील सैनिक अशोक खाडे सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी रविवारी ग्रामस्थांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.स्वागताल या जवानाची सोनेरी रथामधून ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढून घरोघरी सडा रांगोळी काढून औक्षण करून भव्य स्वागत करण्यात आले
आष्टी तालुक्यातील वाळूंज येथील सैनिक अशोक मधूकर खाडे यांनी देशसेवा पूर्ण करुन आपल्या मूळ गावी परतल्यावर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सोनेरी रथामधून मिरवणूक काढून सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.लाॅकडाऊनच्या काळात धनंजय गावडे फौजी व भिमराव खाडे फौजी हे सेवा निवृत्त झाले होते.त्यांचे मान्यवरांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले,यावेळी मा. जि.सदस्य देविदास धस,युवा नेते जयदत्त धस,जि.प.सदस्य अमरराजे निंबाळकर,जि.प.सदस्य माऊली जरांगे,भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,गणेश शिंदे,सरपंच घनश्याम खाडे,उपसरपंच लहु खाडे,बिबिषण कदम,वाल्मिक तोडकर,बलभिम बापु खाडे,मा.सरपंच विष्णू खाडे,सोमनाथ शिंदे,ह.भ.प सुरेश महाराज राऊत,पोपट खाडे,अशोक राऊत,मोहन शिंदे,दादा कर्डीले,बाबासाहेब बळे,आलम बेग, जालिंदर राऊत,जगश्नाथ खाडे,दिलीप पवार,दादासाहेब खाडे,मधुकर खाडे,कस्तुराबाई खाडे,उर्मिला खाडे,बाप शिंदे,हरिष हातवटे,विजु महाराज गावडे,साहेबराव खाडे,शहाजी राऊत,शरद गर्जे आदी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास धस हे होते यावेळी प्रस्ताविक मा.सरपंच विष्णू खाडे,देविदास धस, खाडे बापु,जयदत्त धस, माऊली जरांगे,अमरराजे निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले आभार भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी मानले सूत्रसंचालन हरिदास हातवटे यांनी केले,
गावातुन सकाळी सोनेरी रथामधून मिरवणूक सजवलेल्या रथातुन काढण्यात आली सर्व ग्रामस्थ व महिला जमा झाल्या निवृत्त जवान सपत्नीक रथामध्ये बसले ग्रामस्थांचा उत्साह पाहून तेही भावुक झाले. “भारत माता की जय’ असा जयघोष करीत व वाद्यवृंदांच्या साथीने गावात ही मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी ध्वज पताकाही लावण्यात आल्या.कार्यक्रम स्थळु मिरवणूक पोचल्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात महिलांनी या सैनिकांचे औक्षणही केले