संग्रामपुर [ मकसूद अली ]
राज्यमहामार्गा सह नाल्या बांधकाम सुरु होते परंतु काहि दिवसा पासुन नाल्याचे काम थंडबसत्यात असल्याने अपुर्ण असलेल्या नाली बांधकामा जवळ पावसाळ्याचे व गावातील सांडपाणी वार्ड नं ५ व वार्ड नं ६ मधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्या विहिरीत विसर्ग होत असल्याने सदर विहिरीचे पाणी दुषित होत असल्याची तक्रार संबंधीत वार्डातील नागरिकांनी दुरध्वनीव्दारे माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांच्या कडे केल्याने क्षणाचा विलंब न करता तात्काळ नागरिकांच्या हाकेवर घटना स्थळी दाखल होऊन विहिरीतील दुषित पाणी व लगत डबक्याची पाहनी करुन राज्यमहामार्ग अंतर्गत नाली बांधकाम करित असलेल्या कृष्णाई कंत्राटदार कंपनीच्या अधिकारी पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकारी काळे दुरध्वनी व्दारे संपर्क साधुन सांडपाणी विहिरीत होत असलेल्या विसंर्ग असल्याने सदर विहिरीतील पाणी दुषित झाल्याने तात्काळ अपुर्ण नाली बांधकाम विहिरी पासुन वळविल्याने सुचना दिल्या वरुन संबंधीत अधिकारी यांनी नाली बांधकाम मार्ग वळविल्याने नागरिकांच्या तक्रारीचे निवारण झाल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांचे कौतुक होत असुन आभार मानले जात आहे समाजकारणातुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यास सदा अग्रेसर राहणारे न्याय मिळवुन दिल्या शिवाय स्वस्थ बसने नाही तसेच भविष्यात समस्या निरा करण साठी सदैव तत्पर असल्याचे आश्वासन उपस्थित नागरिकांना दिल्या वरुन नागरिकांकडून जि प उपाध्यक्ष भोंगळ यांचे आभार मानले