संग्रामपुर [ मकसूद अली ]
संग्रामपूर , शेगाव व जळगांव जा या तिन्ही तालुक्यात दि १६ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीमुळे व सततच्या पाऊसा सह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुंबल्याने कपाशी , सोयाबीन , ज्वारी , मक्का , उळीद , केळी , फळबाग व इतर पिके ही पाण्याखाली असुन खराब झाली आहे वादळी वाऱ्यामुळे पिके जमिनदोस्त झाली आहेत तिन्ही तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट आर्थिक मदत द्या पिक विमा द्या अशी मांगणी एका निवेदनाव्दारे माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी पालकमंत्री ना डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्या कडे केली आहे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि तिन्ही तालुक्यात पिके कापनिस आलेली होती परंतु सततच्या पावसामुळे सदर पिकाचे मोठे नुकसान होवुन शेतक – यांच्या हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे हिराखुन घेतले आहे . शेतकऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आसमानी व सुलतानी संकटाना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे शेतकरी हा हवालदिल व चिंताग्रस्त झालेला आहे तरी शासनाने कुठल्याही नियम व निकषाच्या अटी न लावता सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई , पिकविमा व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी तिन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हवालदिन झालेल्या शेतकन्यांना शासनाची सरसकट मदत मिळवून द्यावी अशी मांगणी माजी जि प उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी केली आहे
बॉक्स
पालक मंत्री ना डॉ शिंगणे पिक विमा कंपनीला शेतकऱ्याच्या पिक विमा रक्कम तफावत संदर्भात चौकशीचे आदेश
गेल्या वर्षीचा पिक विमासाठी चाल ढकल सुरु होते महाविकास आघाडी सरकारच्या संबंधीत विभागाने सतत पाठपुरावा केल्याने पिक विमा कंपनीने पिक विमा मंजुर करावा लागला व महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मात्र पिक विम्याच्या रकमेत तफावत असल्याने बहुताश शेतकऱ्यां साठी अन्याय कारक असुन बहुताश शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे ते तिनशे पाचशे रुपये आल्याने संभ्रम निर्माण होऊन नाराजीचा सुर निघत असल्याने योग्य नियमा नुसार पिक विमा मंजुर रक्कम मिळावी याबाबत पालकमंत्री ना डॉ शिंगणे यांच्याशी माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी चर्चा केली असता विना विलंब पिक विमा कंपनीला पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी चौकशी करुन शेतकऱ्याना हक्काचे पिक विमा मंजुर रक्कम द्या अशी सुचना केली असता पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करुन शेतकऱ्याना न्याय दिले जाईल असे आश्वासन दिल्याने पिक विमा काढलेल्या क्षेत्रा प्रमाणे रककम मिळणार असल्याने शेतकऱ्यात उत्साह संचारला आहे