वसमत / डॉ नागोराव जांबूतकर
तालूक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 20 21 22 चा 41,वा गव्हान पूजनाचा कार्यक्रम आज रोजी कारखान्याचे सन्मा अध्यक्ष तथा राष्ट्रीय साखर संघांचे आध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार राजू भैया नवघरे अंबादास राव भोसले महादेव एकलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री पंडितराव देशमुख श्री मुंजाजीराव जाधव म श्री पांडुरंग कदम माऊली श्री उत्तम राव दगडू श्री रामदास सवराते श्री कोंडबाराव जोगदंड श्री शिवाजीराव मोरे अडवोकेट रामचंद्र बागल अडवोकेट तेलगोटे श्री सतीश कुसळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष श्री शिवाजीराव देसाई यांनी केले या वेळी कारखान्याचे अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मार्गदर्शन करताना कारखाना कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असला तरीही परिसरातील इतर कारखान्यामार्फत अतिरिक्त ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले सभासदांनी बी एस आय पुणे यांच्याकडून ऊसाची रोपे घेण्यासाठी कारखान्याकडे नावे नोंदवावी नवीन जातीमुळे ऊस उत्पादनात वाढ होणार आहे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्यांची पॅकिंग व तो बाहेर देशात पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले भविष्यात कारण स्थळी सर्व सोयी युक्त असे सुसज्ज हॉस्पिटल वाढणार असल्याचे सांगितले कारखान्याचे संचालक मंडळ सभासद व कामगार या सर्वांनी मिळून कारखान्याचा हा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जबाबदारीने काम करावे असे अध्यक्ष महोदयांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्य सह .बँकेचे अधिकारी श्री पी एम बोकारे कारखान्याचे सर्व संचालक माजी संचालक श्री गंगाधर धवन परिसरातील सभासद शेतकरी बंधू तोड वाहतूक ठेकेदार कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय श्री प्रल्हादराव काळे यांनी आभार प्रदर्शन केले त्यावेळी परिसरातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .