आष्टी / पठाण शाहनवाज
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आष्टी यांच्या वतीने आज तहसिलदार साहेब आष्टी, यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री भार सरकार मा. रामदासजी आठवले साहेब व जिल्हाध्यक्ष बीड पप्पूजी कागदे यांच्या आदेशावरून तहसील कार्यालय समोर निदर्शने करून निवेदन दिले.निवेदनात
गायरान जमिनीचे सातबारा देण्यात यावे.रमाई घरकुलाची ग्रां.पं. ठरावाची अट रद्द करावी. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे.शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रू. नुकसान भरपाई दयावी.दलीत वस्तीमध्ये ग्रा.पं. ने 20% खर्च करावा.
संजय गांधी निराधारांना 2 हजार रूपये महिना करावा.दलित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रत्येक कॉलेजने त्वरील दयावी,कडा येथील गायरान धारकांना तहसीलदारांनी दिलेले नोटीस मागे घेण्यात यावे.असे निवेदनात म्हटले आहे.
वरील मागण्या शासनाकडे पाठवून शासनाला कळवावे व सहानुभूती पूर्वक विचार करावा,अशी मागणी केली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले साहेब व जिल्हाध्यक्ष मा.पप्पुजी कागदे साहेब यांच्या आदेशावरून तहसीलदार यांना निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आष्टी तालुकाध्यक्ष मा.अशोक(भाऊ)साळवे, उपाध्यक्ष मा.अरुण(भैय्या)निकाळजे, शांताराम जोगदंड, शशिकांत निकाळजे, मच्छिंद्र घाटविसावे, नामदेव अरुण, शेषराव आढाव, सुनील जाधव, बाबासाहेब गायकवाड, अनिल माळी, एस.बी.साळवे, मधु शिरोळे, बंटी साळवे, व शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.