संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत रात्री 12 वाजता दरम्यान शाॅर्ट सर्किट मुळे आग लागली. यात संगणक संच जळून खाक झाला. शाॅर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती बॅंक प्रशासनाने दिली कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने काही जागरूक नागरिकांना याची जाणीव झाली. शिपाई देवकर
अजय व्यास,रमणलाल सेवक, कुशल दवे, योगेश तायडे आदींनी रात्री शाखा उघडून आग विजवली यामुळे मोठा अनर्थ टळला.
या आगीत बँकचा एक संगणक संच व कागदपत्र जळाले पंचनामा न झाल्यामुळे नुकसानाची आकडेवारी समजू शकली नाही. दरम्यान बुधवारी बॅंकेचे कामकाज बंद होते.