संग्रामपुर [ मकसूद अली ]
सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे भावहे गगनाला भिडले आहेत तसेच गॅस सिलेंडर डिझेल व पेट्रोलचे भाव कमी न होता दिवसेन दिवस गॅस पेट्रोल डिझेलची दरवाढ होत असल्याने केंन्द्रसरकारने महागाईवर अंकुश लावुन जिवनावश्यक वस्तु सह इंधन दरवाढ कमी करावी अन्यथा लोकशाहि मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने केंन्दसरकारला दिला आहे
तहसिलदार डॉ वराडे यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि भाजपा प्रणीत केंन्द्रसरकारच्या कार्यकाळात शेतकरी शेत मजुर सर्व सामान्य नागरिकांना जिवनावश्यक वस्तु पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीमुळे संसाराचा गाडा हाकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याने महागाईला वैतागला आहे अतोनात हाल होत असल्याने आर्थिक गणीत कोलमडले त्यामुळे केन्द्र सरकारच्या वाढत्या महागाईचा निषेध करीत केन्द्र सरकार विरुद्ध निदर्शेने केली वाढत्या माहागई वर केन्द्र सरकारने अंकुश लाऊन जिवनावश्यक वस्तु , पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी करावी अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने लोकशाहि मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी विश्वनाथ झाडोकार, माजी जि प उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष संगितराव भोंगळ , आदिवासी नेते दुर्गासिंग सोळंके , राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पंकज ठाकरे , नारायण ढगे ,राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हुसेन शाह, साबीर खान , शिवाजी भिसे ,अन्सार खान ,अंकुश कड , शेख मोबीन कुरेशी, सोपान रावणकार , सुनिल बकाल ,अमोल व्यवहारे , दिलीप बोरसे , बाळू साबे , स्वप्नील वानखडे, उपस्थीत होते