संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे एका निवेदनाव्दारे रिपाई आठवडे गट यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे व सततच्या पाऊसा सह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी तुंबल्याने कपाशी , सोयाबीन , ज्वारी , मक्का , उळीद , केळी , फळबाग व इतर पिके ही पाण्याखाली असुन खराब झाली आहे वादळी वाऱ्यामुळे पिके जमिनदोस्त झाली आहेत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल्याने ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट आर्थिक मदत द्या पिक विमा द्या अशी मांगणी निवेदनाव्दारे रिपाई तालुका अध्यक्ष बाबूलाल ईगळे,भारत शिरसाट, शे हुसेन,गजानन तायडे, प्रकाश ईगळे,सुनील सोनोने यांनी केली आहे