संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यात पातुर्डा गाव सर्वात मोठे असुन वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत होत होता तसेच विजेचा लपंडाव लोडशेर्डिंग यातुन नागरिकांची मुक्त व्हावी म्हणुन दानशुर सामाजीक कार्यात रस असलेले स्वर्गीय भिकमचंद उर्फ लालासेठ चांडक यांनी तन मन धनाने पातुर्डा गावठाण साठी सतत प्रयत्न करुन मंजुर केले गाव लगत अल्पदरात जागा उपलब्ध करुन दिल्याने पातुर्डा गावठाण झाले १३२ केव्हिए सब स्टेशन पारेशन या सब स्टेशन मधुन येणारी ३३ केव्हि पातुर्डा व सोनाळा हे दोनी सब स्टेशन एकाच व्हिसीबी वर असल्यामुळे नेहमी वेळोवेळी तांत्रीक दोष मुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने व्हिसीबी स्वतंत्र करण्यात यावे अशी मांगणी माजी उपसरपंच निलेश चांडक यांनी विद्युत वितरण कार्यालय कडे केली आहे १३२ केव्हिए पारेशन सब स्टेशन मधुन येणारी ३३ केव्हि पातुर्डा व सोनाळा सब स्टेशन एकाच व्हिसीबी वर असल्याने वेळोवेळी दोष निर्माण होत असल्याने प्रत्येक वेळी कट पॉईन्ट मोकळा ( ओपन ) करावा लागतो याला दिर्घ वेळ लागत असल्याने पातुर्डा गावातील नागरिकांना कृतिम लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागत असल्याने पातुर्डा सब स्टेशन सोनाळा पासुन वेगळे करण्यात यावे व पातुर्डा सब स्टेशन स्वतंत्र करण्यात यावे अशी मांगणी माजी उपसरपंच चांडक यांनी केली आहे