आष्टी / पठाण शाहनवाज
काल पहाटे 4 च्या दरम्यान तार तुटून पाच पोल पडल्याने धानोरा पिंपळा व वाहीरा या तीन उपकेंद्रचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने अखेर आज विद्युत पुरवठा सुरळीत झाला.अधिक माहिती अशी की,कडा व साबलखेड च्या शिवारात तार तुटल्याने पाच सिमेंटी पोल तुटून पडले यामुळे धानोरा पिंपळा व वाहीरा या उपकेंद्रचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.युवा कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आज दुपारी 12 च्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत झाला.याकामी उपकार्यकारी अभियंता पवार साहेब सहाय्यक अभियंता पांडे साहेब हामिद शेख विष्णु घोडके सोमनाथ शिंदे कर्डिले संतोष अरुण जोशी अशोक काकडे शाकिर शेख अजिनाथ अनफट केशव काकडे माउली खोरदे मोहसिन सय्यद वैजिनाथ झांजे समीर सय्यद यांनी परिश्रम घेतले.