HomeUncategorizedपालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते हाँटेल राजगडचे शुभारंभ.!

पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते हाँटेल राजगडचे शुभारंभ.!

परळी : येथील परळी- अंबाजोगाई रोडवरील हाँटेल राजगडचे मोठ्या थाटात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दि २३ रोजी झाले.महानगरातील हाँटेलचा आस्वाद परळीकरांना मिळणार आहे.असे, उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा देताना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी गौरवोद्गार काढले. यामुळे पुणे- मुंबई येथील हाँटेलचा दर्जा परळीकरांना व पंचक्रोशीतील, ग्राहकांना मिळणार आहे.मा.माणिक भाऊ फड यांनी ही सुविधा दिली आहे.यावेळी असेही ते म्हणाले.

                शहरातील हाँटेल राजगडचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून,आ.संजय दौंड तर प्रमुख पाहुणे म्हणून,परळी न.प.चे गटनेते वाल्मीक आण्णा कराड तसेच, जिल्हा परिषदेचे सदस्य भगवान सानप व बीड, नांदेड, सोलापूर, बारामती,पुणे तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकार, डॉक्टर सर्व क्षेत्रातील मित्र मंडळी व नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे युवा नेते माणिकभाऊ फड यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून स्वागत करण्यात आले. सत्कार प्रसंगी उद्योजक बालासाहेब फड, रायचंद फड, फुलचंद फड, सुरेश (नाना) फड व इतर उपस्थित होते. या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षांव सुरू होता. हाँटेल राजगडच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थितांचे माणिकभाऊ हरिश्चंद्र फड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ व संचालक राजस्थानी बँक परळी, फुलचंद हरिश्चंद्र फड,रायचंद हरिश्चंद्र फड प्रोप्रा.राज कंन्ट्रक्शन कंपनी परळी यांनी आभार मानले. माणिकभाऊ फड सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.यापुर्वीही त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात नाव कमावले आहे. हाँटेल व्यवसायातही नाव करतील.यावेळी या शानदार उद्घाटन सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments