आष्टी / पठाण शाहनवाज
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ व इतर योजनांतील निराधार लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.मानधन मिळण्यासाठी ते आष्टी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.आष्टी तालुक्यात संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे २८ हजार लाभार्थ्यां आहेत. अनेक विधवा,अपंग आणि वृद्ध आहेत. मागील तीन महिन्यापासून त्यांना मानधन
मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.निराधारांचे मानधन दिवाळीपूर्वी पाठवावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा म.फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे यांनी दिला आहे.आष्टी तालुक्यातील संजय गांधी,श्रावणबाळ व ईतर योजनेतील लाभार्थीचे थकीत
मानधन आष्टी तहसील कार्यालयात जमा असताना अधिका-यांचा हलगर्जीपणा होत आहे. दिवाळीपर्यंत प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावर मानधन रक्कम जमा करावी आशी आग्रही मागणी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
यावर प्रभारी तहसिलदार मोरे यांनी आम्ही लवकरच निराधारांचे मानधन त्यांच्या खात्यात जमा करीत आहोत असे सांगीतले.त्यांची दिवाळी गोड होईल असे आश्वासन दिले.