HomeUncategorizedअंबाजोगाईत कार्यकर्ता मेळाव्यातून काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन..!!

अंबाजोगाईत कार्यकर्ता मेळाव्यातून काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन..!!

अंबाजोगाई : बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार,दिनांक २४ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईत आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास मार्गदर्शन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी काँग्रेस पक्ष संपला नाही व पुढेही संपणार नाही.कारण,काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य माणसाच्या मनात कायम जिवंत आहे.भाजपाने देशाचे स्वातंत्र्य व संविधान धोक्यात आणले आहे.त्यामुळे घाबरून जाण्याचे काम नाही कारण,देश व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.आगामी काळात बीड जिल्हा काँग्रेसमय करण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणार आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी केले.अंबाजोगाईत कार्यकर्ता मेळाव्यातून काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.तसेच नवनिर्वाचित खासदार सौ.रजनीताई पाटील यांचा भव्य सत्कार केला.

अंबाजोगाईत आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले तर विचारमंचावर सत्कारमूर्ती म्हणून खासदार सौ.रजनीताई अशोकराव पाटील,माजी मंञी अशोकराव पाटील,ज्येष्ठ नेते बाबुरावजी मुंडे,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख,माजी आमदार सिराजभाई देशमुख,किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष एॅड.माधव जाधव,आदित्य पाटील,अभय साळुंखे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिलराव मुंडे,महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मिनाक्षीताई पांडुळे पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,हणमंतराव मोरे,नवनाथराव थोटे,एॅड.अनंतराव जगतकर,वसंतराव मोरे,तारेखअली उस्मानी,सय्यद बहाद्दूर ऊर्फ हनिफ,पशुपतीनाथ दांगट,जुबेरभाई चाऊस,वसंतराव मोरे,शेख नबी शेख चाँद,बाळासाहेब ठोंबरे,प्रतापराव मोरे,डॉ.इद्रिसभाई,कविताताई कराड,सुबराव सोळंके,नगरसेवक असेफोद्दीन बाबा खतीब,संजयराव देशमुख,विजयकाका देशमुख,संजय काळे,ईश्वर शिंदे,गणेश गंगणे,अशोक देशमुख,शंभूराजे देशमुख,विनोद निंबाळकर,प्रशांत आचार्य,पांडुरंग देशपांडे,बाळासाहेब जगताप आदींसह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.मेळाव्याच्या प्रारंभी आ.नानाभाऊ पटोले यांचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परीसरातील हेलिपॅडवर मान्यवर नेत्यांचे हेलिकॉप्टरमधून आगमन झाले.त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या “जिल्हा काँग्रेस भवन” या संपर्क कार्यालयाचे मान्यवर नेत्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर दुचाकी व चारचाकी वाहनांची भव्य रॅली लोकनेते यशवंतराव चव्हाण चौक-माता रमाई आंबेडकर चौक-शासकीय विश्रामगृह-नवा मोंढा-छञपती शिवाजी महाराज चौक-बस स्थानक ते अंबाजोगाई नगरपरिषद परीसर अशी काढण्यात आली.या रॅलीचा समारोप आद्यकवि मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात झाला.सुरूवातीला शाहीर मामा काळे व संचाने काँग्रेस विचार मांडणारी प्रेरक गीते सादर केली.मेळाव्याच्या प्रारंभी दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मेळाव्याचे प्रास्ताविक करताना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याची संधी द्यावी,आम्ही आपल्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष प्रभावीपणे वाढवू असे सोनवणे हे म्हणाले.तर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की,काँग्रेस ही लोक चळवळ आहे.आ.नानाभाऊ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर आला आहे.खासदार सौ.रजनीताई यांच्या माध्यमातून देशात ही काँग्रेस पक्ष बळकट होत आहे.दुहेरी निष्ठा असणारे लोक पक्ष सोडून गेल्याने यापुढे
सर्वांना सोबत घेवून प्रत्येक तालुक्यात पक्ष वाढवू असे जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले.याप्रसंगी किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष एॅड.माधव जाधव यांनी संकटातील शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी केली.यावेळेस माजी आ.सिराजभाई देशमुख,अभय साळुंखे,बाबुरावजी मुंडे यांचीही समायोचित भाषणे झाली.तर माजी मंञी अशोकराव पाटील यांनी सात वर्षांच्या खंडानंतर असा भव्य मेळावा आयोजित केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष देशमुख यांचे अभिनंदन केले.ज्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांचे स्वागत केले.पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना काँग्रेसने ओळख मिळवून दिली.पण,या नेत्यांनी माञ काँग्रेसचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवला नाही.त्यामुळे येणा-या काळात बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सन्मान आणि पदे दिली जातील असे माजी मंञी पाटील हे म्हणाले.सत्काराला उत्तर देताना खासदार सौ.रजनीताई पाटील म्हणाल्या की,आ.नानाभाऊ यांच्यामुळे राज्यात आणि राजेसाहेब यांच्यामुळे जिल्ह्यात पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.बीड ऐवजी अंबाजोगाईत मेळावा आयोजित केला यामागे जे अंबाजोगाईत पिकतं,तेच मराठवाड्यात विकतं,वैचारिक परंपरा असलेले हे शहर आहे.काँग्रेस नव्याने उभी राहत आहे.कारण,काँग्रेस हा एक सर्वसमावेशक विचार आहे.स्वबळ म्हणजे काँग्रेसची ताकद ओळखा,राहुलजींना पंतप्रधान करायचे आहे.आपला खासदार निधी बीड जिल्ह्याच्या विकासाकरीता देणार आहे.नानाभाऊ आपण सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला मदत करावी अशी अपेक्षा खा.सौ.रजनीताई यांनी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात आ.नानाभाऊ पटोले म्हणाले की,बीडची काँग्रेस ही संपली नसून ती जनतेच्या मनामनात जीवंत आहे.हे आजच्या मेळाव्यातून दिसून आले.केंद्र सरकारकडून ओबीसी,शेकतरी,शेतमजूर,महिला,युवक,छोटे व्यावसायिक यांच्या हिताला बाधा आणली जात आहे.ओबीसींच्या नावाने मोठे झालेल्यांनी राजकीय,शासकीय,सामाजिक क्षेत्रात न्याय दिला नाही.केंद्रात महाविद्वानांचे सरकार आहे.नोटबंदी करून काळे धन आणतो व १५ लाख देतो हे चुनावी जुमले ठरले.रोजगार,शेतकरी संपवले,पेट्रोल,डिझेल दरवाढ केली,जीएसटीचा पैसा आज अदानी व अंबानी यांच्या खिशात जात आहे.काळे कायदे लादणारे केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांना गुलाम बनवू पहात आहेत.लसीकरणाचा कसला उत्सव करता.कोरोनामुळे जे लोक मेले,आंदोलनात जे शेतकरी मृत्यू पावले,देशात चिता पेटल्या याचा हिशोब मागायची वेळ आता आली आहे.मोदी तोंडाच्या वाटेने देश चालवू लागलेत,त्यामुळे ही राजव्यवस्था बदलावी लागेल.यापुढे पक्षात काँग्रेस पक्ष निष्ठावंतांना मोठी ताकद देईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला.कार्यक्रमाचे सुञसंचालन ज्योती शिंदे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार नारायणराव होके यांनी मानले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी बीड,गेवराई,आष्टी-पाटोदा-शिरूर,माजलगाव,वडवणी,धारूर,केज,परळी,अंबाजोगाई येथील काँग्रेस पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी,नगरसेवक,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,आजी माजी.सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया,इंटक आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता.
*मेळाव्याचे वैशिष्ट्ये :*
◻️जोरदार शक्तिप्रदर्शनातून काँग्रेस संपली म्हणणारांना चपराक.
◻️भव्य चारचाकी,दुचाकी रॅलीने शहर दणाणले.
◻️अंबानगरीत मान्यवरांचे अभूतपूर्व स्वागत.
◻️नेत्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची रीघ.
◻️अनेकांचे पक्ष प्रवेश.
◻️युवक,महिला आणि ज्येष्ठांची जिल्ह्यातून उपस्थिती.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments