संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील कलमखेड येथील राखीव पोलिस दल आस्थापनेवरिल शिपाई पदावर कार्यरत वासुदेव नरहरी शिरसाठ २० एप्रिल १९९३ मध्ये गोदिया जिल्ह्यातील मंगेझिरी येथे भु सुरंग स्फोटात शहिद झाले २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिन निमित्त शहिद जवानाच्या स्मृतीना स्मरण करुन पराक्रमाची माहिती जन जागृती करुन संबंधीत शहिद जवानाच्या कुटुंबांना सन्मान कार्यक्रमाचे आयोजन तामगाव पोलीस ठाण्यात करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सहाय्यक पो उप निरिक्षक श्रीकांत विखे हे होते तर शस्त्र पो उपनिरिक्षक दिपक तायडे , पोलीस नाईक धिरजकुमार नंदागवळी , शशांक शेवडे , तामगाव पोलीस कर्मचारी यांची प्रमुख उपस्थीती होती
यावेळी राखिव पोलीस शहिद वासुदेव शिरसाठ यांच्या प्रतिमेचे पुजन हारअर्पण करुन उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहिद जवानाच्या पराक्रमावर मान्यवरांनी विचार व्यक्त करित स्मृतीना उजाळा दिला तामगाव पोस्टेच्या वतीने शहिद जवान कुटुंबांचा सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक पो उप निरिक्षक श्रीकांत विखे, जमादार डि एम तायडे , पो कॉ विकास गव्वाड , सह तामगाव पोस्टेचे कर्मचारी व शहिद जवानाचे कुटुंब उपस्थीत होते