हिंगोली : वर्ग ११ वी सायंस मधे या वर्षी प्रवेश घेतलेल्या, ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी
JEE NEET MH-CET चे मोफत आॅनलाईन प्रशिक्षण,शिवाय मोफत आठ इंची टॅब, आणि दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा मोफत!
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे! या महाज्योतीच्या वतीने, या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग ११ वी सायंस मधे प्रवेश घेतलेला आहे, व जे विद्यार्थी १२ वी नंतर इंजिनियरींग मेडीकल मधे प्रवेश घेण्यासाठी २०२३ ची JEE NEET व MH-CET ची स्पर्धा परीक्षा देवु इच्छितात! परंतु त्यासाठी लाखो रूपयाचे महागडे कोचिंग क्लास लावु शकत नाही. अशा ओबीसी विजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी, महाज्योतीच्या वतीने मोफत आॅनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी या विषयातले अत्यंत तज्ञ प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रशिक्षण देईल. ( या विद्यार्थ्यांना वर्ग १० वी मधे शहरी विभाग ७०% व ग्रामीण भाग ,६०% मार्क्स असणे आवश्यक, तसेच नाॅन क्रिमीलेयर ,जात प्रमाणपत्र आवश्यक)आॅनलाईन प्रशिक्षण देत असतांना ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांजवळ चांगले किंवा मोबाईल नसतात.. ही गरज लक्षात घेवुन,महाज्योती अशा सर्व विद्यार्थ्यांना अगदी मोफत टॅब देत आहे. या शिवाय या टॅब सोबतच दर दिवशी सहा जीबी इंटरनेट डेटा सुध्दा आॅनलाईन क्लास पहाता यावा,म्हणुन अगदी मोफत देत आहे.ते पुढील शिक्षणासाठीही त्यांना कामी येतील. तसेच या JEE NEET MH-CET स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जातील.
यासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जावुन,तिथे JEE… या नोटीसबोर्डवरील जागेवर क्लीक करावे! त्यावर पुढे दिलेला फार्म दिसेल! तो आॅनलाईन पध्दतीने भरून त्यात नमुद केलेली कागदपत्रे अपलोड करावीत!तसेच आपला संपुर्ण अर्ज अपलोड केल्यावर त्याची प्रत काढुन जवळ ठेवावी.
ही आपली नोंदणी महाज्योतीकडे करण्यासाठी १५ नोंव्हेंबर २०२१ ही अंतिम तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी महाज्योतीच्या या योजनेचा फायदा घ्यावा. तसेच ज्युनियर काॅलेजच्या सन्माननीय विज्ञान विषयाच्या प्राध्यापकांनी,आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आसे आवाहन अ,भा,महात्मा फूले समता परिषदेचे हींगोली जिल्हाध्यक्ष डॉ नागोराव जांबूतकर यांनी केले आहे काही आडचन आल्यास
महाज्योती हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क करावा:7066888845