संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा आठवडी बाजार स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर आहे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विहिर दलितांसाठी खुली केली होती त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर पर्यटन दर्जा मिळवुन देण्यास तत्कालीन शिक्षण मंत्री डॉ शिंगणे यांचा सिहांचा वाटा आहे सदर विहिर व परिसराचे सौदर्यीकरण करण्यासाठी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी जातीने लक्ष देऊन तत्कालीन शिक्षण मंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांच्या प्रयत्नातुन सन २००८ / ९ मध्ये समाजकल्याण विभागा मार्फत १५ लाखाचा निधी मंजुर केला होता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिर सौदर्यरिकरण करुन खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेबांचे विचार माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी पुढे नेण्याचे काम केल्याने बहुजन समाज बांधवा कडून कौतुक होत आहे पर्यटन विकास निधीतुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिर परिसर पर्यटन विकासात्मक शुशोभीकरण साठी विकासात्मक कृति आराखडा तयार करुन ऐतिहासिक विहीर पर्यटन स्थळाचा विकास व्हावा म्हणुन माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी पालकमंत्री डॉ राजेन्द्र शिंगणे यांची भेट घेऊन निवेदन देऊन पातुर्डा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श ऐतिहासिक विहिरीचा पर्यटन विकासात्मक कृति आराखडा बनविण्याची मांगणी केली असता पालकमंत्री ना डॉ शिंगणे यांच्या पुढाकाराने सुचने वरुन जिल्हाधिकारी यांच्या कडून सुत्रे हालले व माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जितेन्द्र काळे , उपविभागीय अधिकारी (महसुल ) वैशाली देवकर , नायब तहसिलदार डॉ वराडे , मंडळ अधिकारी, तलाठी , ग्रामसेवक एस पी मेहेंगे यांनी भेट देऊन ऐतिहासिक विहिर व घटनाकारांनी मुक्का केलेल्या स्थळाची पाहनी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक विहिरीला पर्यटन विकासात्मक कामे करण्यासाठी पातुर्डा ग्रामस्थांच्या संकल्पना सुचना असल्यास निसंकोचपणे लेखी स्वरुपात देण्याचे आव्हान माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी केले आहे
बॉक्स
ऐतिहासिक विहिर पर्यटन परिसराचे विकासात्मक कामे पर्यटन वाढणार पातुर्डा वासियांना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार डॉ बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या ऐतिहासिक विहिर पर्यटन परिसराचे पर्यटन विकास निधीतुन विकासात्म कामे होणार असल्याने ऐतिहासिक परिसरातील व्यवसाईक यांच्या दुकानसाठी संकुल बांधण्यासाठी मांगणी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ पालकमंत्री ना शिंगणे यांच्या कडे करणार आहेत त्यामुळे ऐतिहासिक विहिर पर्यटन परिसराचा येणाऱ्या काहि दिवसात कायापालट होणार असल्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना व पर्यटन सुद्धा वाढेल पर्यटन वाढल्याने रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील एवढे मात्र खरे त्यामुळे ग्रामस्थात नवचैतन्य उत्साह आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे