आष्टी / पठाण शाहनवाज
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा संचलित गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग,आपत्ती व्यवस्थापन विभाग व आय क्यू ए सी विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या ‘मिशन युवा स्वास्थ्य’ योजने अंतर्गत गुरुवार दि.२८ रोजी covid-19 चे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल चानोदिया तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ जयश्री शिंदे, वैद्यकीय अधिकारी आसमा पटेल हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एस राठी म्हणाले की, ज्या युवकांच्या हाती देशाची जबाबदारी द्यायची आहे ते मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या ‘मिशन युवा स्वास्थ्य’ उपक्रमात सर्वजण मिळून खारीचा वाटा उचलून लस घेऊन देश कोरोना मुक्त करू असे सांगितले.
यावेळी डॉ उमेश गांधी म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी लस घ्यावी आणि आपल्या परिसरातील सर्वांना लस घ्यायला लावावी. covid-19 बद्दल चे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लस घेण्यास सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा म्हणाले की, दीड वर्षापासून कोरोना विषाणूचे भय असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले होते. सरकारच्या प्रत्येक मोहिमेला आमच्या संस्थेच्या वतीने संपूर्ण सहकार्य असते असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ अनारसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ मीरा नाथ यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जे एम भंडारी, संस्थेचे विश्वस्त पोपटलाल भळगट तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून १३७ विद्यार्थ्यांनी कोव्हीड लस घेतली.