HomeUncategorizedपैठण - पंढरपुर / राजुरी - खरखंडी महामार्गाच्या प्रश्नांबाबत भाग्यश्री ढाकणे यांनी...

पैठण – पंढरपुर / राजुरी – खरखंडी महामार्गाच्या प्रश्नांबाबत भाग्यश्री ढाकणे यांनी ना गडकरीं यांची भेट घेताच ; ना गडकरी यांनी तत्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आदेश.!

आष्टी : संपूर्ण देशात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या गतीमान विकासाची चर्चा होत असताना बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात मात्र दोन राष्ट्रीय महामार्ग तब्बल पाच वर्षापासून धुळखात पडले आहेत.केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गडकरींची विकासयात्रा या ठिकाणी रोखण्याचे पाप केले जात आहे.विशेष म्हणजे या गंभीर प्रश्नाकडे जबाबदार लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असताना भाजपाच्या रणरागिनी अॅड.भाग्यश्री ढाकणे यांनी राहरी जि.अहमदनगर येथे थेट ना नितीन गडकरी यांना भेटून त्यांच्या कानावर हा प्रश्न घातला .ना.गडकरी यांनी तातडीने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या विकासाची घोडदौड संपूर्ण देशात सुरु असून सामान्य जनतेतून त्यांना मोठे समर्थन मिळत आहे . असे असताना बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन महामार्गाचे काम अडवण्याचे पाप अधिकारी करत आहेत.तब्बल पाच वर्षापासून हे दोन महामार्ग अक्षरशः धुळखात पडले असून यामध्ये पैठण पंढरपुर या पालखी मार्गाचाही समावेश आहे . राष्ट्रीय महामार्ग क्र . ७५२ ई आणि ३६१ एफ हे अहमदनगर आणि बीड या दोन जिल्ह्यातून जातात . या दोन्ही महामार्गाचे निवाडे जाहिर करणे , भुसंपादन करणे ही जबाबदारी दोन्ही ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांची आहे . भुसंपादन प्रक्रिया करण्यासाठी बीडला मच्छिंद्र सुकटे आणि पाथर्डीला केकान नावाचे उपजिल्हाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत . दुर्दैवाची बाब अशी की , २०१७ पासून या दोन्ही मार्गाचे निवाडे आणि भुसंपादन प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही . पैठण पंढरपुर पालखी मार्गावर फक्त भालगाव या एकाच ठिकाणी निवाडे आणि भुसंपादन झाले.केवळ १५ शेतकऱ्यांना मावेजा मिळाला . त्यानंतर मावेजाची रक्कमही संपली . दिड वर्षापासून पुन्हा मावेजापोटी निधी मिळाला नाही.बीड जिल्ह्यातील दहिवंडी , शिरुर , वारणी , राक्षसभुवन , घोगस पारगाव या भागातील शेतकरी अनेक वर्ष या प्रश्नासाठी संघर्ष करत आहेत.परंतु लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कोणीही दाद देण्यास तयार नाही . भाजपा युवा आघाडीच्या नेत्या अॅड . भाग्यश्री ढाकणे यांनी शेतकऱ्यांसाठी सातत्याने आंदोलने केली.लोकशाही मार्गाने संबंधित यंत्रणेकडे निवेदने दिली.परंतु गेंड्याची कातडी असलेले प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही . अखेर या दोन्ही राष्ट्रीय मार्गाला कोणीच वाली नसल्यामुळे अॅड . भाग्यश्री ढाकणे यांनी काल राहुरी येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.खा.सुजय विखे पाटील यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी सहकार्य केले.केंद्र सरकारच्या विकास प्रक्रियेला नगर आणि बीड जिल्ह्यात अशा पध्दतीने अडथळा आणण्याचे काम प्रशासकिय अधिकारी करत असल्याची तक्रार अॅड.ढाकणे यांनी केल्यानंतर ना . गडकरी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments