HomeUncategorizedआजादी का अमृत महोत्सवानिमित्त आष्टी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न.!

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आष्टी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न.!

         


आष्टी ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती आष्टी, आष्टी तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ आक्टोबर रोजी सायंकाळी आष्टी शहारातील अनिलभैय्यानगरात आजादी का अमृत महोत्सवानिमीत्त कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले.यावेळी मा.के.के.माने (अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती आष्टी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आष्टी) यांनी विविध कायदेविषयी तसेच शासकीय योजना विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.आष्टीच्या नायब तहसिलदार श्रीमती शारदा दळवी यांनी महिलांचे अधिकार याविषयी तर विधिज्ञ ॲड.बाळासाहेब झांबरे,
ॲड.विजय शेकडे,ॲड.
संग्राम गळगटे,ॲड.
रत्नदीप निकाळजे यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास मा.व्ही.एन.शिंपी,सहदिवाणी न्यायाधीश आष्टी,वकील संघाचे अध्यक्ष ॲड.महादेव तांदळे, विधिज्ञ संघांचे पदाधिकारी,सदस्य,
सरपंच सौ.आदिकाताई लोखंडे,श्रीमती विमलताई निकाळजे,सेवानिवृत गटविकास अधिकारी बबन खंडागळे,पत्रकार उत्तम बोडखे,गावातील नागरिक उपस्थित होते.प्रस्ताविक ॲड. कु.रजनीगंधा रत्नदीप निकाळजे हिने केले.वयोवृध्द माता पिता यांची जबाबदारी या विषयावर ॲड.बाळासाहेब झांबरे यांनी मार्गदर्शन केले. ॲड.संग्राम गळगटे महिलांचे अधिकार आणि गर्भलिंग निदान या विषयावर मार्गदर्शन केले.ॲड.विजय शेकडे यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सेवानिवृत गटविकास अधिकारी बबन खंडागळे, पत्रकार उत्तम बोडखे, सेवानिवृत ग्रामविकास अधिकारी बी.एच.कांबळे, मिलींद निकाळजे सर,
सेवानिवृत मुख्याध्यापक संपतराव गायकवाड,ग्रामसेवक पी.बी.शाहीर,वकील संघाचे तालुकाध्यक्ष ॲड.महादेव तांंदळे,ॲड.आर.टी.
जगताप,ॲड.बाबुराव अनारसे,ॲड.एस.के.गव्हाणे,
ॲड.सुरेश शिंदे,ॲड.
भाऊसाहेब सायंबर,ॲड.वर्षा
निकाळजे,ॲड.नेहा निकाळजे,ॲड.डी.एस.
ससाणे,ॲड.बाळासाहेब शेकडे,ॲड.विजय ढोबळे,
ॲड.अजय जोशी,ॲड,राकेश हंबर्डे,ॲड.परसराम नरवडे,
ॲड.सतीषकुमार गायकवाड ,ॲड.प्रशांत 
पवार,ॲड,गौतम निकाळजे,
ॲड.नवनाथ शेकडे,
ॲड.कांतीलाल आस्वर,
ॲड.प्रविण डोंगरे,ॲड.
संभाजी दाहातोंडे,ॲड.
शरद कदम,ॲड.संदीप पवार,ॲड.बापुराव गर्जे,
ॲड.गोवींद घुले,ॲड.शशीकांत कुलकर्णी,ॲड.संग्राम गळगटे,
ॲड.प्रकाश वाल्हेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचलन ॲड.रत्नदीप निकाळजे यांनी तर उपस्थितांचे आभार ॲड. सतीश कुमार गायकवाड यांनी मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments