संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील काकणवाडा बु येथे ३१ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री दिड वाजता दरम्यान अचानक गॅस सिलेंन्डरने पेट घेऊन लागलेल्या आगीत ३५ हजार रुपये सोन्या चांदीचे दागिने सह कागद पत्र जळून खाक झाले तर गॅसच्या नळीने पेट घेऊन लागलेल्या आग विजवित असतांना ४ व्यक्ती जखमी झाल्याची घटना घडली सदर गॅस सिलेन्डर च्या स्फोर्टात घरावरील छत संसार उपयोगी साहित्य दुरवर उडून गेली या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील काकणवाडा बु येथे विठ्ठल उगले यांच्या घरी आग लागल्याची घटना रात्री दिड वाजता लघु शंका करतांना विठठल उलगे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आरडा ओरड केल्याने त्यांच्या कुटुबांतील सदस्य व शेजारील नागरिक उठून आगविजवत असतांना उगले कुटुंबातील गोपाल विठ्ठल ऊगले ,श्रीकृष्ण विठ्ठल ऊगले व शेजारील राहुल सुमंन्ता हीप्परकार रवि सुमंन्ता हीप्परकार चौघे जखमी झाले जखमीना सईबाई मोटे रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अकोला सर्वापचार रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले
बॉक्स
माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांची घटना स्थळी भेट संबंधीत कुटुंबांना शासनाकडे आर्थिक मदतीची मांगणी
विठ्ठल उगले यांच्या घरी माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी घटना स्थळी भेट देऊन उगले यांच्या व शेजारील कुटुंबाची आस्थेने धिर दिला काकणवाडा बु येथे विठ्ठल उगले यांच्या घरी
रात्री एक ते दीड च्या दरम्यान आग लागल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यकर्ते सोपान रावणकार यांनी दुरध्वनीद्वारे माजी जि प संगितराव भोंगळ यांना दिल्या वरुन आज सकाळी माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ घटना स्थळी पोहचले व पाहनी केली व माहिती घेतली यात आग विजविण्या साठी उगले कुटुंबाना शेजारील रहिवासी मदतीला धावुन आले आग ने उग्र रुप धारण केल्याने गॅसचा भयंकर मोठा स्पोर्ट त्यात ४ व्यक्ती जखमी झाले तात्ळीने सर्व जखमींना अकोला मेन हॉस्पीटल हलविण्यात आले गॅस सिलेन्डच्या झालेल्या स्फोर्ट मध्ये घरावरचे पूर्ण तीन उडून गेले तसेच घरांच्या भिंती क्षती ग्रस्त झाल्याने व गॅस सिलेन्डरच्या आगीने ३५ हजार रुपये रोखड सोन्या चांदीचे दागीने महत्वाचे कागद पत्रा सह जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने उगले कुटुंबांना व जखमीना आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी केली या वेळी काकणवाडा सरपंच संतोष पारिशे , पोलीस पाटील विजय इंगळे , सोपान रावणकार ,नारायण ढगे , अजय सोनी , उत्तम हातेकर व ग्रामस्थ उपस्थीत होते