संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा खुर्द मंडळ अंतर्गत पातुर्डा खुर्द टाकळी पंच , आस्वंद या तिन्ही गावात १६ ऑक्टो पुर्वी मुसळधार अतिवृष्टी मुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतांना संबंधीत तलाठी मंडळ अधिकारी कृषि विभागाचे कर्मचारी यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान पाहनी करुन पंचनामे केले मात्र तरिहि तिन्ही गावातील शेतकरी अतिवृष्टी नुकसान अनुदाना पासुन वंचीत असल्याने अतिवृष्टी नुकसान अनुदान यादीत पातुर्डा खुर्द , टाकळी पंच आस्वंद गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्याची नावे समाविष्ट करण्यात यावे अन्यथा तिन्ही गावातील शेतकरी आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे शेतकऱ्यांनी दिला आहे तहसिलदार वरणगावकर यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि तालुक्यातील पातुर्डा खुर्द , टाकळी पंच , आस्वंद या तिन्ही गावात १६ ऑक्टो रोजी व त्यापुर्वी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना घटना स्थळी संबंधीत तलाठी , कृषि सहाय्यक , मंडळ अधिकारी , कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थीतत अतिवृष्टी ग्रस्त मुळे झालेल्या पिक पाहणी केली मात्र शासनाने अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत जाहिर केली असतांना महसुल विभागाच्या दुर्लक्षामुळे पातुर्डा खुर्द ,टाकळी पंच आस्वंद या गावा शेतकरी शासनाने देऊ केलेली अतिवृष्टी नुकसान अनुदाना पासुन वंचीत असल्याने अतिवृष्टी अनुदान यादीत तिन्ही गावातील शेतकऱ्यांचा समाविष्ट करुन अतिवृष्टमुळे पिक नुकसान अनुदान देण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा अड विरेन्द्र झाडोकार , रविन्द्र झाडोकार , संजय वाकळे , गजानन इंगळे , रामदास ठाकरे , विलास मानकर , ज्ञानेश्वर वाकळे , सुनिल मेहेंगे , विनोद येनकर, अनिल झाडोकार , वामनराव सुलताने , विनायक येनकर , निखिल दातकर , शिवदास इंगळे , आदि शेतकऱ्यांनी महसुल प्रशासनाला दिला आहे