संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा सेंन्टर बॅक शाखेला शार्ट सर्किटमुळे आग लागुन संगणक व कागदपत्रे जळून खाक झाले गेल्या पंरतु पंधरा दिवस पासुन व्यापारी शेतकरी वृद्ध विधवा बचत खातेदार सदर बॅकेत चकरा मारुन वैतागले पातुर्डा गावाचा आठवडी बाजार असल्याने परिसरातील नागरिकांनी बॅंक समोर गर्दी केली बॅक संतप्त नागरिकांनी भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांची भेट घेऊन समस्या मांडली असता लोकेश राठी यांनी बॅकेत भेट देऊन बॅक व्यवस्थापक हजर नसल्याने बॅकेला कुलुप लावुन ताला ठोको आंदोलन करण्यात आला यापुर्वी भाजपा पदाधिकारी यांनी बॅक व्यवस्थापक अधिकारी यांची भेट घेऊन बॅकेचे व्यवहार बंद असल्याने तांत्रीक दोष दुर करण्याची मांगणी केली १ नोव्हेंबर सोमवारला व्यवहार पुर्वरत सुरु करण्याचे आश्वासन संबंधीत बॅक मॅनेजर ने दिले होते परंतु परिस्थिती जैसे थे असल्याची ओरड नागरिकां कडून होत असल्याचे समजताच बॅकेचे वरिष्ट अधिकारी कडून उडवा उडवीचे उत्तर मिळाल्याने संतप्त होऊन आज बॅंक व्यवहार बंदच असल्याचे निर्देशात येताच संताप व्यक्त केला करित भाजपाच्या वतीने सेंन्टर बॅक पातुर्डा शाखेला कुलुप ठोकले यावेळी तालुका अध्यक्ष लोकेश राठी, रामदास म्हसाळ, अविनाश धर्माळ,सुनिल मेंहगे,संजय मेंहगे सह शेतकरी , निराधार, विधवा , खातेदार मोठया संख्येने उपस्थित होते उद्या बॅकेचे व्यवहार पुर्वरत सुरु होऊन नागरिकांना हक्काचे पैसे न मिळाल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी भाजपाच्या वतीने बॅक प्रशासनाला देण्यात आला