आष्टी। प्रतिनिधी
आष्टी येथील सिनेकलावंत सुरेश विश्वकर्मा यांना अमरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०२१ चा उत्कृष्ट खलनायक पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल आष्टी येथील फ्रेन्डशिप क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
येथील सिनेकलावंत सुरेश विश्वकर्मा यांना अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आवडी या कादंबरीवर आधारित असलेला इभ्रत या चित्रपटातील रावजी पाटील या भूमिकेसाठी खलनायकाचा उत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती सुरेश विश्वकर्मा यांनी माध्यमांशी बोलताना गुरुवार दि ४ ऑक्टोबर रोजी माहिती दिली याबाबत आष्टी येथील फ्रेन्डशिप क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अॅड दीपक शामधिरे फ्रेंडशिप क्लबचे फिटनेस कोच मोसिन कुरेशी,आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, बाळासाहेब घोडके,पत्रकार अविशांत कुमकर, अक्षय भोसले, अजीम शेख,सोनल निकाळजे आदी उपस्थित होते