संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील लाडणापूर येथे कोरोना काळात सोनोने दाम्पत्य यांचे निधन झाल्याने सोनोने कुटुंबातील अनाथ झालेल्या मुलां सोबत संग्रामपूर मित्र परिवाराने महसुल विभागाचे शिक्षण विभागाचे पोलीस विभागाचे अधिकारी , वैधकिय अधिकारी व सामाजीक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या उपस्थीत दिवाळी साजरी केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर होत्या तर यावेळी संग्रामपुर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव पुरोहित , विभागीय अधिकारी वैशाली देवकर, नांदुरा पोस्टेचे ठाणेदार भूषण गावंडे , मेजर प्रभूदास सपकाळ , पि.एस.आय. आशीष मोरखडे, ओम हॉस्पीटलचे संचालक डॉ प्रविण चोपडे पाटील, डॉ संजयमहाजन ,गटशिक्षणाधिकारी ढगे , सामाजिक कार्यकर्ते राजेश लहासे, तामगाव पोस्टेचे पो उप निरिक्षक श्रीकांत विखे , डॉक्टर अंभोरे , सरपंच मानकर , यांची उपस्थीती होती या प्रसंगी १९ मुला मुलींना दिवाळीच्या निमित्ताने संग्रामपूर मित्र परिवाराचे शंकरराव पुरोहित यांचे कडून रेडीमेड ड्रेस , पी.एस.आय. आशिष मोरखडे यांचे कडून श्वेटर , प्रा. हरीभाऊ तायडे यांचे कडून कानटोपी मोजे जोड, गटशिक्षणाधिकारी ढगे यांचे कडून पेढे , तर शिक्षक मिलींद सोनोने यांचे कडून दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले, तसेच राजेश लहासे यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून प्रत्येक मुलाला ११०० रुपये महिना मिळवुन देण्यासाठी जातीने प्रयत्न करण्याचे जाहिर केले व संबंधीत मुलांचे अर्ज भरून घेतले प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी ढगे यांनी केले, राजेश लहासे तसेच डॉक्टर प्रविण पाटील यांनी समायोचीत भाषणातुन समाजातील दानशुर व्यक्तीने आप आपल्या क्षेत्र असलेल्या माध्यमातुन निराधार अनाथांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान केले. प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी ढगे यांनी केले संचालन शिक्षक मिलींद सोनोने यांनी केले तर श्याम कौलकार यांनी आभार मानले कार्यक्रमाला संग्रामपूर मित्र परिवाराचे सदस्य वैभव गायकी अतुल वानखडे, मोहन उकर्डे व लाडणापुर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते
बॉक्स
१ ) अनाथ मुलांना सर्व शासकिय योजने लाभ मिळवुन देऊ उपविभागीय अधिकारी देवकर
केन्द्र व राज्य शासनाने अनाथ मुलासाठी सुरु केलेल्या सर्व योजनेचा लाभ भविष्यासाठी मिळवुन देण्यासाठी सर्व परिणे महसुल प्रशासन सहकार्य करणार आहे या मुलांच्या भविष्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सर्व योजनांचा लाभ दिला जाईल उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर
२ )ओम हॉस्पीटल मध्ये मोफत उपचार डॉ प्रविण चोपडे
कोरोना काळात सोनोने दाम्पत्य यांच्या मुत्यू नंतर अनाथ झालेल्या त्यांच्या पाल्याचे अकोला येथील ओम हॉस्पीटल मध्ये मोफत औषध उपचार करण्यात येईल असे ओम हॉस्पीटलचे संचालक डॉ प्रविण चोपडे पाटील यांनी जाहिर केले
३ ) कु आचल राजु सोनोने हिचे मेजर सपकाळ यांनी पालकत्व स्विकारुन कार्यक्रमा स्थळी संबंधीत मुलीच्या भविष्यातल्या सोई सुविधा साठी तात्काळ पंचविस हजार रुपायाचा धनादेश मेजर प्रभुदास सपकाळ यांनी सोनोने कुटुंबाला सुपुर्त केला