संग्रामपुर[ मकसूद अली ]
पातुर्डा आस्वंद टाकळी पंच पातुर्डा खुर्द परिसरात अतिवृष्टी ढग फुटी होऊनही महसुल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी शासकिय मदती पासुन वंचीत ठेवल्याने माजी मंत्री आ डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या वतीने महसुल प्रशासन व राज्य शासनाचा निषेध करित संग्रामपुर तहसिल समोर ठेचा भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान होवूनही ह्या तालुक्याची आणेवारी ५०टक्क्याचे वर जाहीर केली.जाहीर केलेली मदत सुद्धा तोडकी देत आहे .त्यामुळे दिवाळीच्या दिवशी संग्रामपूर तहसिल कार्यालयाचे आवारातच माजी मंत्री तथा आमदार डाॕ.संजय कुटे यांचे नेतृत्वाखाली चक्क बेसन भाकर ठेचा खावून महाविकास आघाडीचा निषेध करुन आंदोलन केले व ही दिवाळी काळा दिवस म्हणून साजरी केली.तालुक्यात यावर्षी खरीप पिकांचे ढगफुटी, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मुंग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, कापसाचे अतोनात नुकसान झाले.या संकट समयी राज्य शासनाने पाठिशी उभे राहण्याची नितांत गरज असतांना महाराष्ट्र सरकार मात्र दुजाभाव करत असल्याचे चित्र आहे.संग्रामपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतेही पिक आले नसतांना तालुक्याची सुधारित आणेवारी 50%टक्कया पेक्षा जास्त दाखवुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना आजुनही पिक विमा मिळाला नाही.आर्थिक मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही.ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्यावी.तसेच ढगफुटी झालेल्या पातुर्डा बु,पातुर्डा खु,टाकळी पंच,आस्वंद, या गावांना महसुल कर्मचारी यांच्या हलगर्जी पणामुळे मदतीतुन वगळण्याचे कुकर्म केले. त्यामुळे शासन प्रशासना विरोधात संग्रामपुर तालुका भाजपाचे वतीने माजी मंत्री आमदार डाॕ.संजय कुटे यांच्या नेतृत्वात दिवाळीचे दिवशी बेसन भाकर व मिरचीचा ठेचा,खाऊन या महाभकास आघाडी शासनाचा निषेध व्यक्त करुन आंदोलन करण्यात आले .सरकारने मागण्या मंजूर न केल्यास यापेक्षाही जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सज्जडा इशारा दिला.आजचा दिवाळीचा दिवस हा शुभेच्छा देण्याचा दिवस नसून काळा दिवस मानून दिवाळी करावी असे आव्हान कार्यकर्ते यांना आ कुटे यांनी केले,या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी, यांचे सह जिल्हा व तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते ,विशेष म्हणजे महिला पदाधिकारी आणि शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.
बॉक्स
९ नोव्हेबर रोजी माजी मंत्री आ डॉ कुटे यांचे शेकडो शेतकऱ्यांच्या सह ठिय्या आंदोलन पातुर्डा टाकळी पंच आस्वंद पातुर्डा खुर्द परिसरात ढग फुटी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले महसुल कृषि विभागाचे कर्मचारी यांनी भेट देऊन सर्वे केले मात्र कुठे माशी शिंकली हे न समजणारे कोडे असुन संबंधीत मंडळ अधिकारी तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे संबंधीत गावातील वंचीत शेतकऱ्याना पिक नुकसान भरपाई मिळावी व संबंधीत मंडळ अधिकारी तलाठी यांची चौकशी करुन कारवाई साठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्या साठी संबंधीत शेतकऱ्यांच्या सक्षम ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री आ डॉ संजय कुटे यांनी दिल्याने महसुल विभागात अस्वस्थता खळबळ उडाली एवढे मात्र खरे