आष्टी प्रतिनिधी :- बीड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या वतीने नुकतीच औरंगाबाद येथे होणा-या विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र च्या मान्यतेने दि.7 नोव्हेंबर रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर प्रथमच विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बीड जिल्हा संघ निवडण्यात आला असुन हा संघ विभागीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. बीड जिल्हा संघ : कुणाल चाटे कर्णधार, किरण दहिफळे उपकर्णधार, सत्यम बिडगर, फड ओंमकेश, महेश घुगे, कराड अभिषेक, अमोल पगारे, साईराज मोरे, सुमित साळवे, मोहन गरूड,करमळकर चिन्मय, यश पाटील,दिपक गिते,साहिल तांबट,कुलदीप गायकवाड . निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन सुरेश मोरे, कांतीलालजी चानोदिया, शकिल शेख,सय्यद बबलु,तसेच मा.सभापती अंकुश चव्हाण, अनिल ढोबळे, सुनिल ससाने, सूर्यकांत शेकडे, प्रा.राम बोडखे तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.