संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील वरवट बकाल विद्युत कार्यालय अंतर्गत वरवट खंडेराव हेडवर कार्यरत लाईनमन सागर चौधरी यांच्या कडे भोन सावळी, वरवट खंडेराव , खिरोडा , हिंगणा या गावाचा कारभार असल्याने वरवट बकाल विद्युत कार्यालयातील सहाय्यक अभियंता बोर्डे व विद्युत कर्मचारी पातुर्डा परिसरात विद्युत थकबाकी वसुली मोहिम राबवित असतांना भोन ,सावळी, वरवट खंडेराव या गावातील १० घरगुती विद्युत ग्राहकांकडून ४२ हजार ६२० परस्पर घेऊन विद्युत कार्यालयात विद्युत ग्राहकांकडून विज बिला पोटी घेतलेल्या पैसेचा भरणा न करता अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला तसेच घरगुती विद्युत ग्राहकांचे पैसे घेऊन भरणा न केल्याच्या तक्रारीत दिवसेन दिवस वाढ होत असतांना विद्युत वितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्या कडून संबंधीत लाईनमनवर कारवाई तर सोडा साधी चौकशी करण्यात न आल्याची ओरड विद्युत ग्राहकांकडून होत आहे संबंधीत विज ग्राहकांनी पैसे हडप करणाऱ्या लाईनमन चौधरी वर कारवाई करण्याची मांगणी केली आहे विद्युत ग्राहकांकडून ४२ हजार पैकी वरवट बकाल विद्युत कार्यालयात २९ हजार रुपयाचा भरणा केल्याची माहिती विद्युत वितरण कार्यालय कडून मिळाली तालुक्यात विद्युत वितरण कार्यालय कडून विज ग्राहकांकडे थब बाकी असल्याने विज बील वसुली सुरु असुन वरवट बकाल विद्युत वितरण कार्यालयचे सहाय्यक अभियंता विजय बोर्डे हे विद्युत कर्मचारी सह विज बील वसुली मोहिमे अंतर्गत विज ग्राहकांच्या घरोघरी जावुन थकबाकी वसुली करित असतांना वरवट खंडेराव विज ग्राहकांकडे सहाय्यक अभियंता बोर्डे यांनी विज थकबाकीचा भरणा करण्यासाठी सांगितले असता वरवट खंडेराव भोन सावळी तिन गावातील १० नागरिकांनी लाईनमन सागर चौधरी कडे विज बील थकबाकी पैकी रक्कम भरल्याचे सांगितले मात्र संबंधीत ग्राहकांच्या थकबाकी मधुन रक्कम कमी न होता वाढल्याचे यादी दाखविली तिन गावातील १० थकबाकी विज ग्राहकांचे लाईनमन चौधरी यांनी पैसे घेऊन विद्युत कार्यालयात भरणा न केल्याचा स्पष्ट झाले व थकबाकी विज बील ग्राहकांचे पैश्याचा अपहार केल्याने संबंधीत विद्युत ग्राहकांनी लाईनमन चौधरी विरुद्ध कारवाईची मांगणी केली होती मात्र विद्युत ग्राहकांचे पैसे हडप करणाऱ्या संबंधीत लाईनमन विरुद्ध विद्युत वितरण कडे सतत तक्रारी सुरु आहेत तक्रारी सुरु असतांना चौकशी करुन कारवाई मांगणी संबंधीत विज ग्राहकांकडून होत आहे मात्र कार्यालयीन कारवाई सोडा साधी चौकशी न झाल्याने नागरिकांचे पैसे घेऊन शासकीय तिजोरीत भरणा न करणाऱ्या संबंधीत लाईनमनवर कारवाई थंडबसत्यात का ? याला पाठबळ कुणाचे असा प्रश्न विज ग्राहका कडून उपस्थीत होत असतांना याकडे विद्युत वितरणचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन संबंधीत लाईनमनची खाते निहाय चौकशी व कारवाई करणे गरजेचे आहे