HomeUncategorizedनापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नेकनूर (प्रतिनिधी)जिल्ह्यात सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यातच सरकारकडून तुटपुंजी मदत केली गेली त्यामुळे झालेला खर्च आणि मिळालेली मदत याचा ताळमेळ बसत नसून शेतकरी नैराश्यातून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
 नेकनूर येथील सोनाजीराव काशीनाथ मुळे वय 60 वर्ष रा. मुळे गल्ली ता. जिल्हा बीड या शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आलेल्या नैराश्यातुन गळफास घेऊन आत्महत्या केली.रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान नेकनूर परिसरातील मोरवंडी शिवारात बाभळीच्या झाडाला त्यांचा मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस स्टेशन चे श्री.खांडेकर, श्री.पवार , श्री.राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेदनासाठी नेकनूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आला. सोनाजीराव मुळे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments