संग्रामपुर [ मकसूद अली ]
त्रीपुरा येथील मुस्लीम समुदायावर झालेल्या अमानुष अत्याचाराचा जाहीर निषेध करत त्रीपुरा येथील निष्पाप मुस्लीम समुदायाचे घर जाळण्यात आले दोषी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई व पोलीस प्रशासनाच्या समोर घटना झाल्याने दोषी पोलीसांवर कारवाई करुन राज्य शासना बरखास्त करा राष्ट्रपती शासन लागु करा अशी मांगणी तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यांच्या कडे मुसलीम सेवा संघाच्या वतीने एका निवेदन व्दारे केली आहे दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि मुसलीमांचे घर जाळून मस्जीदी जाळुन जमीनदोस्त करुन त्या जागेवर विशिष्ट समुदायाचे झंडे लावण्यात आले ही घटना अशोभनीय लोकशाहिला काळीमा फासणारी गैर संविधानीक आहे . ही घटना घडत असतांना पोलीस प्रशासन उघडया डोळयांनी पहात होती या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर मोक्का कायदे अंर्तगत कठोर कार्यावही कारण्यात यावी तसेच या घटणेला एका प्रकारे मुकसंहमती देणारे पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यावर बडतर्फीची कार्यावाही करण्यात यावी तसेच या प्रकरणाचे उच्चस्तरीय समीती नेमुण निषपक्ष चौकशी करण्यात यावी राज्य शासन बरखास्त करुन राष्ट्रपती शासना लागु करण्यात यावी अशी मांगणी तहसिलदार मार्फत एका निवेदनाव्दारे राष्ट्रपती यांच्या कडे केली अब्दुल हमीद अड तनजीम मिर्झा , माजी सैनिक निंबोळकार , शेख सलीम , साबीर खान , शेख कारिस , फारुक शेख , रमीज शेख , तौसिफ जमादार , शेख नईम , खालीक शेख , निसार शेख , दिलीप रायपुरे , आसिफ शेख , उपस्थीत होते