संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा जि.प. सर्कलमध्ये ढगफुटी व अतिवृष्टी झालेली असुन पातुर्डा बु आस्वंद पातुर्डा खुर्द टाकळी पंच येथील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मालांचे मोठया प्रमाणावर नुकसान होऊनही मंडळ अधिकारी तलाठी यांनी कर्तव्यात कसुर करुन हलगर्जी पणामुळे ढगफुटी अतिवृष्टी शासकिय मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे अतिवृष्टी यादी मध्ये पातुर्डा बु व पातुर्डा खुर्द मंडळ अंतर्गत गावे समाविष्ट करुन संबंधीत मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर कारवाई करा अशी मांगणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या सह पदाधिकारी व वंचीत शेतकऱ्यांनी केली आहे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि तलाठी , मंडळ अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शासकीय अनुदान मदतीपासुन वंचीत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी शेतकन्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी, जेष्ठ नेते भारत वाघ, युवा नेते नारायण अवचार, अविनाश धर्माळ ,रामदास म्हसाळ, गोपाल वाकडे, दत्ता डिक्कर,संजय मेंहगे,सुनिल मेंहगे,पराग घोराड, विठ्ठल वानखडे, रामदास ठाकरे ऊकर्डा कुरवाळे सह शेतकऱ्यांनी दिला आहे