नांदेड प्रतिनिधी : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अखिल भारतीय किसान मजदूर सभा यांच्या संयुक्त पणे दिव्यांग वृध्द निराधार गायरान पट्टेधारक यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर केंद्रीय सचिव काँ अशोक घायाळे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागेकरण्यासाठी
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार वंदन साठे चौक पासुन ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वंदन करून श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे आक्रोश व आदिवासी नृत्य व घोषणेची संताप व्यक्त करीत धडकला.
मोर्चातील शिस्टमंडळ मा निवासी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सोबत अनेक विषयांवर चर्चा करून सतरा मागन्याचे निवेदण सादर केले.
दिव्यांग सं. संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल यांनी ज्या दिव्यांग वृध्द निराधार यांना जिवन जगण्यासाठी शासन दरमहा एक हजार रूपये दिले जाते त्यात दोन वेळा चहासाठी दुध तरी मिळते काय? ते कसे जगतील हे लोकप्रतिनिधी प्रशासन यांना लक्षात येत नसेल काय? लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांचे लाखो रूपये मिळताना त्यांचे कुटुंब चालत नाही म्हणून वेतन वाढ केली जाते तर दिनदुबळ्याना का वाढ होत नाही तेहि चार ते सहा महिने मिळत नसेल तर ते कसे जगत असतील त्यांचे दु:ख लोकप्रतिनिधी प्रशासनास कधी लक्षात येतील
दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनो जागे होऊन संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नाही म्हणून सर्वानी संघटितपणे संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले
काँ. अशोक घायाळे यांनी भुमीहिन गायरान पट्टैधारक यांना शासकीय जमीन दिल्यास त्यांना सुखासमाधानाने जगता येईल म्हणून शासनाने मसुरा जमीन, परंमपुक,गायरान,डोंगराळ,सिलिंग,वनजमीन,गावठाण जमीन,देैवस्थानची ई जमीन दिव्यांग, भूमिहीन यांना न देता हजारो एकर जमीन ट्ष्टला दिली जाते .व जे चाळिस वर्षापासून जमीन गायरान पट्टे ज्यानी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना ते पट्टे शासन प्रशासन कोणत्याही सुचना न देता ऊभ्या पिकाची नासाडी करून जमा करून घेत असल्यामुळे शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी आपण सर्वांनी संघटिपतपणे लढाईत शिलेदार झाल्याशिवाय न्याय मिळत नाही.
या मोर्चात ऊतम गायकवाड,वंसतराव कुडमते, पोटफोडे,सोपान नरहरे, मानेजी पाटिल,दादाराव बंङे ई कार्यकर्त्यांनी शासन प्रशासन यांच्या वर आपल्या भाषणात संताप व्यक्त केला.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर नवले, बालाजी होनपारखे,गजानन वंहिदे मैञे,किसन,विठ्ठलराव बेलकर ईत्यादी कार्यकर्त्यांचा सह्या आहेत असे प्रसिध्दी दिले