अंबाजोगाई : ९ वे आंबाजोगाई साहित्य संमेलन 4 व 5 डिसेंबर रोजी येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात भरणार आहे, अशी माहिती या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सौ कमल गोविंदराव बरुळे यांनी दिली. संमेलनाचे अध्यक्ष डॉ कमलाकर कांबळे आहेत.
15-16 ऑक्टोबरला होणारे हे संमेलन काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आले होते.
मराठवाडा साहित्य परिषद (मसाप) व जेष्ठ नागरिक संघ यांच्या बैठकात 4 व 5 डिसेंबर या तारखावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच संमेलन तयारीसाठी बोलावलेल्या स्वागत सभासदांच्या बैठकीत देखील नव्या तारखाना मान्यता देण्यात आली.
*कार्यक्रम पत्रिकेत बदल नाही*
संमेलनाची तारीख बदलली पण कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आला नाही असे सांगून सौ बरुळे म्हणाल्या की, संमेलनाचे उद्घाटन 4 दिसेम्बर रोजी दुपारी 3 वाजता डॉ अरुण डावळे यांच्या हस्ते होईल व 5 तारखेला समारोपाचे भाषण भगवानराव शिंदे करणार आहेत.
संमेलनात एक कथाकथन, दोन परिसंवाद, दोन कविसंमेलन होणार आहेत. शिवाय एक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या शिवाय जेष्टांसोबत सेल्फी घेण्यासाठी खास सेल्फी कट्टा उभारला जाणार आहे. चित्र, शिल्प, फोटो व पुस्तके यांचे प्रदर्शन रसिकांचे आकर्षण ठरणार आहे.
4 व 5 डिसेंबरला होणाऱ्या ९ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनात आंबाजोगाईतील रसिकांनी जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष कमलताई बरुळे यांनी केले आहे.