आष्टी / प्रतिनिधी :- कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित गांधी महाविद्यालय येथे कार्यरत असलेले श्री.महेंद्र पेठकर सर यांनी जवळपास 6 महीने अथक परिश्रम घेऊन 318 पानी समर्पण कादंबरी लिहिली असून “समर्पण” ही कादंबरी ऐंशी ते नव्वदच्या दशकातील महाविद्यालयीन युवकाच्या जीवनावर आधारित आहे. या कथेतील नायक हा एक अतिशय सामान्य कुटुंबातील असुन प्रयत्न व मित्रांच्या सहकार्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील स्वप्न साकार करण्याची उमेद मिळते. या प्रवासात तो अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जातो. जीवनसाथी ‘आसावरीने’ दाखवलेले धैर्य व प्रसंगावधानता सर्वांचे चित्त थरारून टाकणारी आहे. प्रस्तुत कथा हि वाचकांच्या हृदयाला साद घालणारी आहे.काल दि 8 रोजी करमाळा तालुक्यातील जेऊर येथे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी नागराज मंजुळे यांनी पेठकर सर यांना पुढील वाट चालीस शुभेच्छा दिल्या.तसेच कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळास भेट देण्याचे आश्वासन दिले.समर्पण ही कादंबरी नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रकाशन करून व त्यांना भेट देऊन कादंबरी लिहिल्याचे खरे सार्थक झाले असल्याचे पेठकर सर यांनी सांगितले.यावेळी नागेश झांजुर्ने,विट्ठल नाना क्षिरसागर,विशाल गुळवे आदि उपस्थित होते.
नागराज मंजुळे यांच्या हस्ते समर्पण कादंबरीचे प्रकाशन
RELATED ARTICLES