आष्टी (प्रतिनिधी): एस.टी.राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावे, व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष मा.राज ठाकरे यांच्या व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, संतोष नागरगोजे.सुमित खांबेकर, अशोक भाऊ तावरे, वैभव काकडे यांच्या आदेशाने आष्टी आगारातील कर्मचार्यांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला.यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे यांनी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर येथून पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी आपल्या सोबत आंदोलनात सक्रिय सहभागी असेल असे आश्वासन दिले.तसेच आगारप्रमुख डोके यांच्याबरोबर चर्चा करून कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यास सांगितले.पाठींबा दिल्याबद्दल एस.टी. कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मेटे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब झांबरे, अनिल जाधव, सोमनाथ कोतकर, अरुण गावडे, सुभाष मेटे,रोहिदास गावडे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.