संग्रामपुर [ मकसूद अली ]
तालुक्यातील पातुर्डा येथील १९ वर्षीय युवकाचा वाननदि पात्रातील डोहात पाय घसरुन बुडून मुत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजता घडली या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि पातुर्डा येथील रहिवासी १९ वर्षीय मजुर शेख समीर शेख शारिक मिळेल ते मजुरी करित होता पातुर्डा खुर्द नेकनामपुर शिवारातील वाननदि पात्रातील डोहात पाय घसरुन बुडून मुत्यू झाला तामगाव पोस्टेला नातेवाईकांनी दिलेल्या माहिती वरुन बीट जमादार किशोर तिवारी , संदिप सोनोने यांनी पंचनामा करुन श्वविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले तामगाव पोस्टेला आकास्मित मुत्यूची नोंद केली अत्यंत गरिब कुटुंबातील घरातील कर्ता पुरुष होता नैसगिक आपत्ती अंतर्गत शासनाने मृतक शेख समीर च्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मांगणी होत आहे मृतक
शेख समीर यांचेवर शोकाकुल वातावरणात स्थानीक मोठ्या कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आले