नेकनूर( प्रतिनिधी) प्रमिला देवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय नेकनुर येथे भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणुन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब मोटे, तसेच पालक व प्रतिष्ठित नागरिक खुसरो अहमद व लालु जाहागीरदार यांच्या हस्ते भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. दादासाहेब मोटे म्हणाले की, मौलाना अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा प्रवास हा, महान स्वातंत्र्य सेनानी, ख्यातनाम शिक्षणतज्ञ, भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून आपल्याला परिचित आहे, तसेच यूजीसी विश्वविद्यालय अनुदान आयोग च्या मार्फत जे शिक्षण दिले जात आहे त्याची स्थापन करण्याचे कार्य मौलाना आझाद यांनी केलेले आहे. असे प्रतिपादन या प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मुजावर एस.टी.यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कलाणे कांतराव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा
RELATED ARTICLES