HomeUncategorizedसर्व समाजातील नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे मेजर प्रभुदास सपकाळ यांचे ...

सर्व समाजातील नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे मेजर प्रभुदास सपकाळ यांचे आवाहन

संग्रामपूर [ मकसूद अली ]कोरोनाचा धोका टळलेला नाही कोरोनाची तिसरीलाट लक्षात घेता स्वता व कुटुंब सुरक्षितेसाठी सर्व समाजातील नागरिकांनी कोविड लसिकरण करुन घ्यावे असे आव्हान मेजर प्रभुदास सपकाळ यांनी महसुल विभाग नगर पंचायत पोलीस प्रशासन संग्रामपुर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्माने केंन्द्र शासनाने हर घर दस्तक कोविड लसिकरण मोहिमे अंतर्गत घरोघरो जावुन कोविड लसिकरण करुन घेऊन स्वता व कुटुंब सुरक्षित करुन घेण्या बाबत जनजागृती केली कोरोनाची तिसरी लाटेचा धोका लक्षात घेता संग्रामपूर मित्र परिवार उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी केलेल्या आवाहना नुसार संग्रामपूर शहरात घर निहाय कुटुंबांना लसीकरण जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन मेजर प्रभुदास सपकाळ , उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे व संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. संग्रामपूर शहरात वार्ड निहाय जनजागृती अभियान चालू असताना संग्रामपूर मित्र परिवाराच्या कोरोनाचा काळात करत असलेल्या उपक्रमाची दखल घेत उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे , नगर पंचायतचे मुख्याधिकारी रेखा वाणी , तामगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो उप निरिक्ष श्रीकांत विखे , मेजर प्रभुदास सपकाळ व संग्रामपुर मित्र परिवाराचे पदाधिकारी , महसुल कर्मचारी यांनी उपस्थित राहून जनजागृती करण्यासाठी सहकार्य केले संग्रामपुर शहरात १०० टक्के लसीकरण करून घेऊ अशी ग्वाही संग्रामपुर मित्र परिवाराने दिली. संग्रामपूर शहरातील बऱ्याच नागरिकांनी लस घेऊन कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सहकार्य केले आहे. संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे कोरोना लसीकरणसाठी सर्वांनी पुढाकार घ्या व नागरीकांनी शासन प्रशासनआरोग्य विभागाला सहकार्य करावे ,लसीकरण हा प्रभावी प्रतिबंधात्मक उपचार असून १८ वर्षांवरील सर्व नागरिक व दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सुद्धा उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे , मेजर प्रभुदास सपकाळ , संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी महसुल विभागाचे , आरोग्य विभागाचे ,पोलीस प्रशासन संग्रामपुर मित्र परिवार , नागरिक उपस्थीत होते

   
                   बॉक्स
सर्व शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोविड लस घेणे अनिवार्य उपविभागीय अधिकारी कोरे 
शासकिय योजने अंतर्गत लाभ घेण्या साठी सर्व नागरिकांनी कोविड लसिकरण करुन घेणे अनिवार्य असुन कोविड लस न घेणाऱ्याना सर्व शासकीय लाभ बंद करण्यात येईल शासकिय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही तेव्हा शासकिय लाभ घेण्या साठी कोविड लस घेण्याचे आव्हाण हर घर दस्तक मोहिम जन जागृती अभियान अंतर्गत उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी केले  
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments