HomeUncategorized५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनास सुरुवातमुख्य ; अभियंता मोहन आव्हाड यांनी...

५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनास सुरुवातमुख्य ; अभियंता मोहन आव्हाड यांनी केले उदघाटन

परळी (प्रतिनिधी) : परळी औ.वि. केंद्राला ५० वर्ष पुर्ण होत असुन या पर्वावर परळी केंद्राचा ५० वा सुवर्ण मोहत्सवी वर्धापन दिनाचे उदघाटन परळी औ.वि. केंद्राचे मुख्य अभियंता तथा कुटुंब प्रमुख मोहन आव्हाड यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे शानदार आयोजना द्वारे करण्यात आले.
             परळी केंद्राचा इतिहास व केंद्रातून होणारी वीज निर्मिती तसेच वेगवेगळे मिळालेले उच्चांक हे गौरवशाली असल्याचे मत या उदघाटन प्रसंगी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी व्यक्त केले, या वर्धापन दिना निमित्त क्रिकेट, व्हॅलीबॉल , टेबल टेनिस, कुस्ती, धावणे , लांब उडी, गोळा फेक, थाली फेक, भाला भेक, कॅरम , बुद्धिबळ, महिला कर्मचारी , दिव्यांग कर्मचारी यांच्या करिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत.
             तसेच कर्मचारी/अभियंते/अधिकारी यांच्या कुटुंबिय व पाल्य यांच्या कलागुणांना वाव मिळावा करिता विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ०८.११.२०२१ ते १३.११.२०२१ पर्यंत घेतले जाणार आहे. तसेच संजय खंदारे, (भा.प्र.से.) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मिती यांनी त्यांच्या दि. ०८.११.२०२१ रोजीच्या भेटी दरम्यान औ.वि. केंद्र, परळी वैजनाथच्या ५० व्या वर्धापन दिना निमित्त खुप खुप शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. या उदघाटना करिता केंद्राचे उप मुख्य अभियंता अवचार, राठोड, अधिक्षक अभियंता इंगळे, अधिक्षक अभियंता होळंबे, सचिव राजु घुले, सहचिव मजहर खान पठाण, उध्दव फड सर्व विभाग प्रमुख व ईतर मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments