संग्रामपुर [ मकसूद अली ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहीवाशी असलेले ५५ वर्षीय शेतकरीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ११ वाजता उघडकीस आली आत्महत्या करणारे शेतकरीचे नाव भारत नारायण म्हसाळ आहे
थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि पातुर्डा परिसरात ढग फुटी अतिवृष्टी झाल्याने वान नदी पुर्णा नदीला पुर आला होता पुर्णा नदी काठावरिल शेती पिक खरडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पुरग्रस्त भागाचे सर्वे होऊनही शासकीय मदती पासुन संबंधीत शेतकरी वंचीत आहेत त्याचाच एक भाग शेतकरी भारत म्हसाळ यांचे कडे सेंन्टर बॅकेचे १ लाख पिक कर्ज असुन त्यात शेती पिक पुराच्या पाण्यात वाहून गेले खरडून गेलेली जमीर रब्बी पिकासाठी तयार करुन हरबरा पेरणी केली मात्र खरडून गेलेल्या शेती नुकसान भरपाई न मिळाल्याने गेल्या काहि दिवसा पासुन कमी बोलने व अस्वस्थ दिसत होते आज स्वताच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना सकाळी ११ वाजता उघडकीस आली
गेल्या दोन वर्षा पासुन नापीकी यावर्षी ढगफुटी अतिवृष्टीमुळे शेती सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही कृषि प्रधान देशात पिक विमा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शासकीय अनुदान पासुन वंचीत असल्याने शोकांतीकाच असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्या कडून उपस्थीत होत आहेत शेती उद्योग डबघाईत आला आहे शेती उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने या वर्षी अतिवृष्टी पुर्णाच्या पुराचे पाण्याने होत्याचे नव्हते केले त्यामुळे नैराश्य पोटी शेतकरी भारत म्हसाळ यांनी नायलोण दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन जिवन यात्रा संपवली म्हसाळ कुटुंबांवर दुखाचे डोंगर कोसळले असुन शासनाने संबंधीत कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी होत आहे सदर घटनेची माहिती बीट जमादार किशोर तिवारी यांना समजताच घटना स्थळी जावुन पंचनामा करुन प्रेत श्वविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले शोकाकुल वातावरणात स्थानिक स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मृतक शेतकरीच्या पश्चात पत्नी ,भाऊ , २ मुले , सुन बराच आप्त परिवार आहे