संग्रामपुर [ मकसूद अली] येथील नगर पंचायतचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपल्याने माहे डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या संग्रामपुर नगर पंचायत सार्वत्रीक निवडणुक २०२१ अंतर्गत १७ प्रभागचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत मागील काही महिन्यापुर्वी काढण्यात आली होती.परंतु उच्च न्यायालयाचे आदेशानुसार२७ टक्केच्या वर आरक्षण जावू नये याकरीता निवडणूक निर्वाचन विभागाकाकडून नव्याने आरक्षण काढण्यात यावे त्यानुसार आज दि.१५/नोव्हेंबर रोजी संग्रामपुर तहसिल निर्वाचन विभागात परमविरसिंग दयालसिंग चव्हाण व सोहम अनंत मारोडे ह्या दोन लहान मुलांच्या हातुन प्रभाग निहाय चिट्ट्या काढुन उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी आरक्षण सोडत जाहिर केले. आजच्या आरक्षण सोडत नुसार यावेळी १७ वार्डापैकी ६ वार्डात निवडून यावयाचे जागेत बदल झाला. जाहीर झालेले आरक्षण खालील प्रमाणे —
प्रभाग १ सर्वसाधारण , प्रभाग 2 अनु.जाती महिला, प्रभाग 3 सर्व साधारण , प्रभाग 4 अनु. जाती’; प्रभाग 5 सर्व साधारण महिला; प्रभाग 6 सर्व साधारण महिला , प्रभाग 7 सर्व साधारण , प्रभाग 8 ना . मा . प्र , प्रभाग 9 सर्व साधारण महिला; प्रभाग 10 ना . मा . प्र महिला; प्रभाग 11 ना . मा . प्र प्रभाग 12 सर्व साधारण , प्रभाग 13 सर्व साधारण महिला, प्रभाग 14 सर्व साधारण प्रभाग 15 सर्व साधारण महिला 16 ना मा प्र महिला , प्रभाग 17 सर्व साधारण महिला असे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी उपरोक्त प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहिर केले यावेळी तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर; संग्रामपुर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी कु.रेखा वाणी , नगर पंचायत चे अधिक्षक शरद कोल्हे व संग्रामपूर शहरातील विविध पदाधिकारी निर्वाचन विभागाचे ठाकरे न.पं चे कर्मचारी , नागरिक उपस्थीत होते