गेवराई : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज, इंदौर संस्थानाचे श्रीमंत भूषणराजे होळकर महाराज यांनी आज गेवराई येथीक एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या आंदोलनाला पाठिंबा दिला.
राजघराण्यात जन्माला येऊन सामान्य एस. टी. चालकांसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून टाळ वाजवत आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जेवढ सरकार ताणेल तेवढी या आंदोलनाची धार वाढत जाणार आहे. कारण ही लोक विचारांनी एक झाली आहेत. आणि क्रांती ज्यांनी घडवली त्यांच्या रक्ताची माणस या आंदोलनात सहभागी होत आहे.ही सरकारसाठी चेतावणी आहे.
“समजने वाले को इशारा काफी” आमचा अंत बघू नका निर्णय घ्या नसता आम्ही या प्रश्नाबाबत निष्क्रिय आहोत हे तरी एकदाच सांगून टाका असा इशारा आज गेवराई मधी होळकर यांनी दिला ..
उपस्थितीत-पूजा मोरे,अंगद किवने,समाधान साबळे,प्रलद घुबडे,दत्ता घुमरे,दत्ता पवार ,प्रदीप घुमरे,तात्या घुमरे इत्यादी