संग्रामपूर [ मकसूद अली ] तालुकाभुमी अभिलेख कार्यालय येथे सुरु होउन २५ वर्ष उलटुन गेली असतांना या विभागाकडे तालुक्यातील १११ गावांचे गावठाण व घरांचे नकाशे सनद नाही . म्हणुन महास्वामीत्व योजने अंतर्गत या गावांचा ड्रोन सर्व्हे सुरु करण्यात आला . १६ नोव्हे. पासून सुरु झालेला सर्व्हे २३ नोव्हे. पर्यंत चालणार आहे . डेहराडून येथील सर्व्हे ऑफ इंडीया विभागाचे 2 तज्ञ अधिकारी त्यांच्या ताफ्यासह येथे तळ ठोकुन आहेत तर स्थानीक कर्मचाऱ्यांचे १५ पथक तैनात असुन यात ग्रामसेवक तलाठी व भुमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे यासाठी एसडीओ वैशाली देवकर यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय सनियंत्रण समिती गठीत असुन यात तहसिलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक विस्तार अधिकारी ( पंचायत ) उपअधिक्षक भुमी अभिलेख यांचा समावेश आहे . ड्रोन सर्हेतुन गावातील सर्व घरे ; रस्ते ; शासनाच्या जागा नाले याचे क्षेत्र व सिमा निश्चित होऊन मिळकतीचा नकाशा तयार होइल . प्रॉपर्टी कार्ड व नागरीकांच्या हक्कांचे संरक्षण गावठाण भुमापन नकाशे उपलब्ध होतील . मालकी हक्काचे वाद संपुष्टात येउन जागेसाठीचे भांडण तंटे कमी होतील . गाव सिमांकन घराचे छतावर मालकाचे नाव गाव नमुना अ क्रमांक चे फोटो भुमी अभिलेख कार्यालयाला प्राप्त होतील . ४ कि.मी. चे परीघात येणारी सर्वच गावे ड्रोनच्या एकाच उड्डानात कॅपचर होतील . १११ गावासाठी १५ पथके तैनात करण्यात आली . मंडळ अधिकार्याचे अध्यक्षतेखाली प्रत्येक ग्राम स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत . तालुक्यातील ११ गावांचा सर्व्हे ३० वर्षापुर्वीच झाल्याने ही गावे ड्रोन सर्व्हेतुन वगळण्यात आली यामधे कवठळ, संग्रामपूर, सोनाळा ,पातुर्डा बु,पळशी ,वसाडी, एकलारा, वरवट बकाल, बावनबीर ,खेल थोरात, वानखेड, या गावांचा समावेश आहेत उर्वरीत १११ गावांचा ड्रोन सर्व्हे सुरु करण्यात आला अशी माहीती भुमी अभिलेख कार्यलयाचे अधिकारी कडुबा पारधे यांनी दिली आ.ई चोखट,खडारे,कवडे,कोगदे,दामोदर, आदी कर्मचारी या अभियानात सहभागी झाले आहेत
संग्रामपूर तालुक्यात महास्वामीत्व योजने अंतर्गत भूमिअभिलेखचे गाव निहाय ड्रोन सर्वे
ग्रा प मार्फत जनजागृती नसल्याने नागरिक अनभिज्ञ
प्रत्येक ग्रा. प . प्रशासनाने मुनयादीद्वारे गावात माहीती देणे बंधनकारक असतांना अनेक गावातील लोकांना याबाबत माहीतीच दिल्या गेली नाही त्यामुळे काही गावातील नागरीक संबंधीत ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत
RELATED ARTICLES