HomeUncategorizedआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , विविध रोग किडवर उपाय योजना संदर्भात विद्यार्थीनी रेणुका...

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , विविध रोग किडवर उपाय योजना संदर्भात विद्यार्थीनी रेणुका डोसे चे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

संग्रामपूर [ मकसूद अली ] तालुक्यातील जस्तगांव येथील प्रकाश डोसे यांची मुलगी स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी-महाविद्यालय जळगांव जा येथे अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी रेणुका प्रकाश डोसे हिने तालुक्यातील जस्तगाव येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा तसेच विविध रोग किड त्यावरिल उपाय योजना याविषयी विस्तृत माहिती दिली.या उपक्रमाअंतर्गत कृषी विद्यापीठाचे प्राचार्य . योगेश गवई , कार्यक्रम अधिकारी आटोले , कार्यक्रम समन्वयक वि.टी. कपले , विषयतज्ञपी.एन.ढवळे ,पी.डी.तांगळे ,डी.जी.सोनुने यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या मोबाईल अँप्लिकेशनचा वापर करून पिकाची पळताळणी कशी करावी, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विविध रोग, कीड व त्यावरील उपाययोजना समजावून सांगतांना पिकांची गुणवत्ता व उत्पादन वाढविण्यासाठी कृषि महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी रेणुका डोसे हिने बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी शेतकरी नागोराव डोसे, तेजराव पाटील,जितेंद्र वानखडे, नितीन डोसे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments